Blood Donation Saam Digital
महाराष्ट्र

लातूर, नांदेडमध्ये रक्ताचा तुटवडा, रक्तदात्यांसह, सामाजिक संस्थांना रक्तदानाचे आवाहन

Blood Donation : आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे वाढदिवस आणि या कार्यक्रमा निमित्त होणारे रक्तदान शिबीरे रद्द झाली आहेत.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / संदीप भाेसले

नांदेड आणि लातूर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये तसेच रुग्णालायत रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच आचारसंहिता आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबीर आयाेजन हाेत नसल्याने रुग्णांसाठी अन्य जिल्ह्यातून रक्त उपलब्ध करावे लागत आहे. परंतु त्यासाठी माेठा खर्च पडत आहे. दरम्यान सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्त संकलन, रक्तदान शिबीरासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra News)

नांदेडकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा

नांदेड शहरात एकूण 10 रक्तपेढ्या आहेत. दररोज या सर्व रक्तपेढींना जवळपास 300 रक्ताच्या पिशव्या लागतात. सध्या उन्हाळा असून उन्हाळ्यात रक्तदान शिबीरे खूप कमी प्रमाणात होत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे वाढदिवस आणि या कार्यक्रमा निमित्त होणारे रक्तदान शिबीरे रद्द झाली आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लातूरला रक्ताचा तुटवडा

लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील रक्त संकलन केंद्रांमध्ये जवळपास सर्वच ब्लड ग्रुपच्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. थैलेसीमिया, पॉलीसिथेमिया, अशा रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांना ब्लड चढवण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील सर्वच सामाजिक संस्था, संघटना आणि रक्तदाते यांनी रक्तदान शिबीर घ्यावे असे आवाहन रक्त संकलन केंद्रांकडून करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT