ऐकाव ते नवलच ! बीड मधील प्रेमी युगलांचा शोले स्टाईल 'ड्रामा'; पुढे घडले असं काहीतरी...
ऐकाव ते नवलच ! बीड मधील प्रेमी युगलांचा शोले स्टाईल 'ड्रामा'; पुढे घडले असं काहीतरी... Saam Tv
महाराष्ट्र

ऐकाव ते नवलच ! बीड मधील प्रेमी युगलांचा शोले स्टाईल 'ड्रामा'; पुढे घडले असं काहीतरी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : लग्नाला घरच्यांकडून होकार मिळवण्याकरिता बीडमधील एका प्रेमीयुगुलाने तब्बल १ नाही २ नाही तर १० तास पाण्याच्या टाकीवर हाय होल्टेज ड्रामा केला आहे. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल ठिय्या दिला आहे. कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी बराच वेळ समजूत घालून देखील हे जोडपं पाण्याच्या टाकीवरून उतरायला तयार नव्हते. शेवटी लग्नासाठी कुटुंबीय तयार झाल्यानंतरच ते दोघेही खाली उतरले आहेत.

संबंधित प्रेमीयुगुलाने लग्नासाठी कुटुंबासह पोलिसांना देखील नाकीनऊ आणून सोडले होते. बीड शहरातील रहिवासी असणारा तरुण काही दिवसाअगोदरच हिंगोलीत कामानिमित्त वास्तव्याला गेला होता. याठिकाणी गेल्यावर त्याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. कालांतराने दोघांच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंध मध्ये झाले होते. पण त्यांचे हे गुपचूप प्रेम फार काळ लपून राहिले नाही. याची खबर मुलाच्या घरच्यांना मिळाली होती.

हे देखील पहा-

आपल्या मुलाचे ज्या महिलेवर प्रेम आहे. तिचे अगोदरपासूनच लग्न झाले असून, सध्या नवऱ्यापासून विभक्त राहत आहे. तसेच तिला २ मुलं देखील आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला परत बीडला आणले आहे. दुपारी १२ वाजेनंतर तरुण आणि महिला बीड शहरामधील अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले. मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो, असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

यानंतर कुटुंबियांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. आताच आमचे लग्न लावून द्या, अन्यथा उडी मारतो, असे म्हणत दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर ठिय्या मांडला. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नगरसेवकही आले. या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. सर्वांनी या प्रेमीयुगुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

लग्न लावून देण्याची तयारी देखील दर्शवली. तरी देखील हे युगुल रात्री १० वाजेपर्यंत खाली आले नाही. सुरुवातीला लग्नाची मागणी मान्य करण्यासाठी हे प्रेमी युगूल टाकीवर चढून बसले होते. मात्र, ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांना खाली येण्यास भीती वाटत होती. टाकीच्या खाली झालेली गर्दी बघून आपण खाली आलो तर मारहाण होईल, या भीतीने युगूल खाली येतच नव्हते. अखेर मोबाइलवर फोन करून, त्यांची समजूत काढण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT