Topper Student End Life Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Topper Student End Life: राज्यामध्ये हुशार आणि टॉपर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये ३ विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. ते हे टोकाचे पाऊल का उचलतात वाचा स्पेशल रिपोर्ट...

Priya More

Summary -

  • राज्यात गेल्या १५ दिवसांत तीन टॉपर विद्यार्थ्यांनी आत्महत्या

  • आत्महत्या करणाऱ्यांमध्ये एमबीबीएस आणि नीट टॉपर विद्यार्थ्यांचा समावेश

  • शिक्षणातील वाढता ताण आणि मानसिक दबाव ही प्रमुख कारणं

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय ठरतोय. शाळेत, महाविद्यालयात टॉपर असूनही विद्यार्थी टोकाचा निर्णय का घेतायेत. मात्र टॉपर नेमकं इतके निराश का होतायेत? पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्टमधून...

त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं होती, हातात यशाची प्रमाणपत्रं आणि मनात उज्ज्वल भविष्याची आशा. मात्र एक क्षण असा येतो की सारं काही उद्ध्वस्त होऊन जातं. मागे राहिलेले आयुष्यभरासाठी कोलमडून पडतात. गेल्या 15 दिवसांत राज्यात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 8 ऑक्टोबरला सोलापुरात एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या साक्षी मैलापुरे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारी साक्षी दोन्ही वर्ष चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती.

6 ऑक्टोबरला नाशिकमध्येही अशीच दुर्देवी घटना घडली. "‘मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे. मला आयुष्यात काहीच रस नाहीये. सध्या माझी कोणतीचं ध्येय किंवा स्वप्नं नाहीत, त्यामुळे माझं अस्तित्व अनेकांसाठी त्रासदायक आहे. सो, साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ...’,अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत 17 वर्षाच्या आयुष चव्हाणनं महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. आयुषही शाळेतला एकेकाळचा टॉपर.. त्याला दहावीत तब्बल 95 टक्के मिळाले होते.

गेल्या महिन्यात 24 सप्टेंबरला 19 वर्षीय अनुराग बोरकर यांनं गळफास घेऊन आत्महत्या केली. अनुरागला मेडीकलच्या नीट परिक्षेत तब्बल 99.99 टक्के गूण मिळाले होते... मात्र टॉपर असणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केली. या स्पर्धेच्या युगात मुलांवरचा ताणही वाढत आहे. त्यांचा मनाचा थांग लागणं कधी कठीण होऊन जातं..पालकांची भूमिका अशावेळी खूप महत्वाची ठरते. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये केवळ संवाद नव्हे तर सुसंवाद हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT