ग्रामपंचायत सीतेपार
ग्रामपंचायत सीतेपार  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

धक्कादायक ! दगडाची मुर्ती तोडली म्हणून गावपंचायतीने ठोठावला 21 हजाराचा दंड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित घोरमारे

गोंदिया - शेतातील दगडाची Stone मुर्ती Idol तोडली म्हणून गावपंचायतीने GAv Panchayat 21 हजाराचा दंड ठोठावल्याची घटना गोंदियात Gondia घडली आहे. आमगाव Amgaon तालुक्यातील सीतेपार Sitepar येथील नागरिकांनी अंधश्रद्धेच्या Superstition आहारी जाऊन बेकायदेशीर गाव पंचायतीच्या माध्यमातून टिकाराम पारधी या शेतकऱ्याकडून एकवीस हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना घडली आहे. Shocking The village panchayat imposed fine of Rs 21000 for breaking stone idol

हे देखील पहा -

या घटनेमुळे सीतेपार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी Progressive महाराष्ट्रात एकविसाव्या शतकातसुध्दा लोक अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दाहक वास्तव यातून समोर आले असून आमगांव पोलीसांनी याप्रकरणी सरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण घटना ?

सीतेपार गावातील शेतकरी टिकाराम पारधी यांची दोन एकर शेती असून शेतीच्या कामानिमित्त नांगरणी करण्यासाठी शेतात असलेला ओटा व दगडाची मूर्ती त्यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढली.

तुकाराम पारधी यांनी त्यांच्या शेतात असलेली दगडाची मूर्ती हटवल्यानंतर मूर्तीसंदर्भात गावातील काही व्यक्तींनी आक्षेप घेत, हि मूर्ती गावातील कुलदैवत असून दरवर्षी याची पूजा केली जाते, तू ती मूर्ती काढून गावातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत अश्या पद्धतीने वादावादी सुरु केली.

यासंदर्भात गावातील लोकांनी गाव पंचायत भरवून संबंधित मूर्तीच्या आजूबाजूचा दगडांच्या साहाय्याने रचलेला कठडा दुरुस्त करून द्यावा अशी मागणी करत एकवीस हजार रुपये दंड टिकाराम यांच्याकडून वसूल करण्यात आला.

यावेळी गावातील सरपंच Sarpanch, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व इतर काही नागरिक उपस्थित होते. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संबंधित घटनेची अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दखल घेऊन टिकाराम यांच्यामार्फत आमगाव पोलिस Police स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

आमगांव पोलिसांनी सरपंचासह 9 लोकांना वर भारतीय दंड विधान 143,341,504, 106 व सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा 2016 चे कलम 5,6 व 7 नुसार गुन्हा Case दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT