SHOCKING STING OPERATION EXPOSES MOLDY PRASAD SALE IN SHIRDI saam tv
महाराष्ट्र

शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ? विकला जातोय बुरशी लागलेला प्रसाद

Fungal Prasad In Shirdi Prasad : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. शिर्डीतला हा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नेमका काय धक्कादायक प्रकार समोर आलाय? कोण करतंय भाविकांची फसवणूक? पाहूयात हा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • शिर्डीत भाविकांना बुरशी लागलेला प्रसाद विकला जात असल्याचा आरोप समोर आला.

  • साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

  • या प्रकारामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची प्रसादाच्या नावाखाली सर्रास फसवणूक केली जातेय. मंदिर परिसरातील खासगी दुकानांमध्ये चक्क बुरशी लागलेले आणि कडक झालेले पेढे विकले जात असल्याचा आरोप भाविकांनी केलाय. त्यातच साम टिव्हीनं जेव्हा या खासगी विक्रेत्यांच्या दुकानावर भेट दिली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आलीय.

या पेढ्यांच्या बॉक्सवर ना एक्सपायरी डेट होती.ना हे पेढे नेमके कुठे बनवले याचा पत्ता..त्यामुळे श्रद्धेच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा प्रकार साम इन्वेस्टिगेशनमध्ये समोर आलाय. या निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यानं शिर्डीमधील ग्रामस्थांमध्येही संतापाची लाट पसरलीय.

याप्रकरणात FDA च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर सामच्या प्रतिनिधीला काय माहिती मिळाली पाहूयात. या निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यानं शिर्डीमधील ग्रामस्थांमध्येही संतापाची लाट पसरलीय. याप्रकरणात FDA च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर सामच्या प्रतिनिधीला काय माहिती मिळाली पाहूयात.

निकृष्ट दर्जाच्या आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या या पेढ्यांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांमध्ये आता तीव्र नाराजी पसरलीय. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानं तात्काळ या दुकानांवर धाडी टाकून कारवाई करण्याची गरज आहे. कारण प्रश्न साईंच्या शिर्डीतल्या भाविकांच्या आरोग्याचा आहे. अन्यथा एखाद्या भाविकाच्या जिवावर बेतल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न भाविकांना पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

SCROLL FOR NEXT