Kolhapur Youth Brutally Attacked In Tamilnadu Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: दीड मिनिटांत ७२ वेळा वार, कोल्हापूरच्या तरुणावर तमिळनाडूत कोयत्याने हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Kolhapur Youth Brutally Attacked In Tamilnadu: नोकरीसाठी तमिळनाडूमध्ये गेलेल्या कोल्हापूरच्या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

Summary -

  • रीलसाठी विरोध केल्याने कोल्हापुरच्या तरुणावर जीवघेणा हल्ला

  • तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात ही घटना घडली

  • कोयत्याने हात, पाय, डोक्यावर सपासप वार करण्यात आले

  • अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरातील एका तरुणावर तमिळनाडूमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियासाठी रील बनवण्यास विरोध केल्यानं काही अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. तरुणाच्या हात, पाय, डोकं आणि शरीरावर कोयत्याने अनेक वेळा वार करण्यात आले. दीड मिनिटांमध्ये ७२ वेळा कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तमिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यात ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घटना घडली. सोशल मीडियासाठी रील बनवण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्रातील एका स्थलांतरित कामगारावर अल्पवयीन मुलांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत हा तरुण रेल्वे स्थानकाच्या भिंतीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी काही तासांत आरोपींना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील थिरुथणी रेल्वे स्थानकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला ३४ वर्षीय सूरज नावाचा तरुण चेन्नईहून इलेक्ट्रिक ट्रेनने प्रवास करत होता. याचवेळी चार अल्पवयीन तरुणांनी त्याच्या गळ्याजवळ कोयता धरून रील शूट करण्याचा प्रयत्न केला. सूरजने त्यांना तीव्र विरोध केला आणि याच रागातून अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सूरजचे हात, पाय, डोकं आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले.जखमी अवस्थेत सूरज रेल्वे स्थानकाच्या भिंतीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. प्रवाशांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी प्रथमोपचार करून त्याला थिरुथणी सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तिरुवल्लूर सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. तो सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही अल्पवयीन आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा विकृत प्रकार किती टोकाला गेला याचं हे भयावह उदाहरण आहे. या घटनेनंतर अल्पवयीन गुन्हेगारी आणि सोशल मीडियावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

BJP : भाजपच्या निष्ठावंतांच्या वाट्याला अश्रू, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये राडा, नाराजांना हटवण्यासाठी पोलीस दाखल, पाहा व्हिडिओ

Nikhil Gaikwad : 'काम करण्याचे फळ मिळाले...' उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेता नाराज, पदाचा राजीनामा दिला अन्...

China Video: चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा न करता तरुणाने वाचवलं| VIDEO

SCROLL FOR NEXT