Shahapur crime news saam tv
महाराष्ट्र

Shocking News : भयंकर! आईला शिक्षक असल्याचं सांगितलं, नराधमानं डाव साधला, निर्जनस्थळी नेऊन १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Shahapur Crime Case : एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना शहापूर तालुक्यात घडली. शिक्षक असल्याचे आरोपीने पीडितेच्या आईला सांगितले होते. तसेच शाळेत घेऊन जातो अशी बतावणी केली होती.

Nandkumar Joshi

फय्याज शेख, शहापूर

भोळ्याभाबड्या आईला शिक्षक असल्याच्या भूलथापा देऊन तिच्या १३ वर्षीय मुलीवर एका अनोळखी व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केले. मी वालशेत शाळेवर शिक्षक आहे. मुलीला शाळेत नेतो, गणवेश, आधारकार्ड देतो, तसेच दोन हजार रुपये मिळतील असं प्रलोभन आरोपी कथित शिक्षकानं मुलीच्या आईला दिलं होतं.

पीडित मुलगी ही वालशेत येथील आदिवासी पाड्यावरील राहणारी आहे. मी शिक्षक आहे. तुमच्या मुलीला शाळेत घेऊन जातो. आधारकार्ड आणि दोन हजार रुपये देखील मिळतील, असे प्रलोभन आरोपी शिक्षकानं मुलीच्या आईला दाखवलं. त्यानंतर त्यानं तिला दुचाकीवरून पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्जनस्थळी नेलं. तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर आघात

शहापूर तालुक्यातील वालशेत ग्रामपंचायत हद्दीतील एका पाड्यावर दुचाकीवरून एक अनोळखी व्यक्ती आली. मी वालशेत शाळेत शिक्षक आहे त्याने सांगितले. तुमच्या मुलीला शाळेत घेऊन जातो, गणवेश देतो, आधारकार्ड देतो आणि तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील असं प्रलोभनही त्यानं पीडित मुलीच्या आईला दाखवलं.

शिक्षक आहेत, मग आईनेही विश्वास ठेवला. मुलीला घेऊन जा आणि घरी परत सोडा असं आईनं सांगितलं. त्यानंतर आरोपी पीडित मुलीला पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांदळी येथे घेऊन गेला. एका निर्जनस्थळी नेलं. तिथं तिच्यावर अत्याचार केले. मुलगी बराच वेळ घरी आली नाही म्हणून शोध सुरू केला. तोपर्यंत पीडित मुलगी एका दुकानापर्यंत पोहोचली. तिथून फोनवरून घरच्यांशी संपर्क साधला. मुलीची आई शहापूर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT