Gondia Shocking News
Gondia Shocking News saam tv
महाराष्ट्र

Shocking News: भयंकर! हे झालंच कसं? घराच्या चौकटीतून निघाले तब्बल 39 साप, अख्ख कुटुंब धक्क्यात

Chandrakant Jagtap

Snake News : सापाचे नाव काढले तरी अनेकांना भीती वाटते. एखाद्याच्या समोर साप आला तर तर त्याला भीतीने घाम फुटेल. पण गोंदियात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे अख्ख कुटुंब धक्क्यात आहे. येथील एका घराच्या दाराच्या चौकटीतून एक दोन नव्हे तर तब्बल 39 साप एकत्र बाहेर पडल्याची घटना घडली आहे.

आपल्या घरात दाराच्या चौकटीत एवढे साप पाहून या घरात राहणाऱ्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल? याची कल्पणा देखील केली तरी अंगावर शहारा येतो. महाराष्ट्रातील गोंदिया शहरात ही घटना घडली असून शास्त्री वॉर्ड परिसरात लाकडापासून बनवलेल्या दरवाजाच्या चौकटीतून एकापाठोपाठ एक अशी अनेक सापांची पिल्ले सापडली आहेत. अनेक तासांच्या ऑपरेशननंतर या सापांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले आहे.

परिसरात एकच खळबळ उडाली

दारात इतके साप पाहून या कुटुंबाला धक्काच बसला. या घटनेमुळे परिसरात देखील एकच खळबळ उडाली. घरातील सर्वजणांच्या मनात भीती भरली. दरम्यान यानंतर एका सर्पमित्राला बोलवण्यात आले आणि त्यांनी दरावाजाची चौकट तपासली तेव्हा त्यात आणखी साप असल्याचे उघड झाले. यानतंर दरवाजाची चौकट खोदून सापांना बाहेर काढण्यात आले. (Shocking News)

४ तास रेस्क्यू ऑपरेशन

सर्पमित्रांच्या मदतीने या कुटुंबातील सदस्यांनी सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुमारे 4 तास दरवाजाची चौकट खोदून हे रेस्क्यू ऑपरेशन केले. यावेळी अंगणातील सर्व फरशांचीही झडती घेण्यात आली. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान दरवाजाच्या चौकटीत साप दिसले. त्याला लोखंडी चिमट्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर आतून एक एक करून साप बाहेर येऊ लागले. (Latest Marathi News)

या संपूर्ण कारवाईत एकूण 39 सापांची पिल्ले जप्त चौकटीतून निघाली. यातील काहींची लांबी ५ ते ७ इंच होती. हे सर्व पकडून प्लास्टिकच्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. यानंतर सर्वांना जंगलात सोडण्यात आले.

आल्यु किल बेक (तस्या) प्रजातीचे साप

या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्पमित्राने सांगितले की, पकडलेली सर्व 39 सापांची पिले आल्यु किल बेक (तस्या) प्रजातीची आहेत. हे साप विषारी नसतात. सहसा अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यावर साप जागा सोडून जातो. तसेच या पिल्लांचा जन्म आठवडाभरापूर्वी झाला असावा असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला. (viral News)

दाराच्या चौकटीत कसे गेले?

मिळालेल्या माहितीनुसार शास्त्री वॉर्डातील या घराच्या अंगणात एक जुनी नाली होती, ती बऱ्याच दिवसांपासून वापरली जात नव्हती. दाराची चौकट जमीनीकाली गेल्यामुळे त्याला कीड लागली होती. त्यामुळे सापांच्या पिलांना सहज किडे खायला मिळू लागले आणि त्यांनी दरवाजाच्या चौकटीतच आपले बस्तान बसवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन

DHFL: 34000 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

Maharashtra Rain: वादळी वारे अन् तुफान गारपीट, पुणे- सातारा, सांगलीला अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा VIDEO

Rain News: अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शिरूरमध्ये पावसामुळे केळीची बाग भुईसपाट

Maharashtra Weather News: पुढच्या ४८ तासांत या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

SCROLL FOR NEXT