Navi Mumbai News: मोठी बातमी! नवी मुंबईत सिडकोमध्ये बोगस कर्मचारी घोटाळा उघड, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

कार्मिक विभागात कार्यरत सिडको अधिकाऱ्याने बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार लाटले असल्याचे समोर येत आहे.
Cidco news
Cidco newssaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Crime News: सिडकोमध्ये बोगस कर्मचारी घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. 2017 पासून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार काढण्यात येत होता. पगारापोटी सिडको अधिकाऱ्याने 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम लाटल्याचे समोर येत आहे. कार्मिक विभागात कार्यरत सिडको अधिकाऱ्याने बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार लाटले असल्याचे समोर येत आहे.

सदर संशयित कर्मचारी सोमवार पासूनच कामावर गैरहजर आहे. याप्रकरणी सिडकोचा दक्षता विभाग अधिक चौकशी करत असून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सिडकोच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी नव्हे तर कंत्राटी पद्धतीवर देखील नियुक्ती झालेली नसताना 28 बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे 2017 पासून वेतन काढून सिडको महामंडळाची सुमारे 3 कोटी रुपयांची फसवणूक सिडकोतीलच अधिकाऱ्यांनी संगनमत करुन केल्याची बाब समोर आली आहे.

Cidco news
Kolhapur Crime News : माजी सरपंचाच्या घरावर सशस्त्र दराेडा, डुकरांसह दहा लाखांची लूट; पाेलिस घटनास्थळी दाखल

या सर्व प्रकारामागे सिडकोच्या कार्मिक विभागातील सहाय्यक कार्मिक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय सिडकोच्या दक्षता विभागाला आला. गेल्या आठ दिवसांपासून कार्मिक विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी व जबाब नोंदवून घेण्याचे काम सुरु होते. तर या विभागातील एक अधिकारी सोमवारपासून कामावर येत नसून त्या व्यक्तीवर संशयाची सुई रोखली जातेय.

काही दिवसांपूर्वी चेतन बावत नामक व्यक्तीने सिडको कार्यालयातील लेखा विभागात जाऊन मी सिडकोत कामाला नसतानाही माझ्या नावे मोठ्या प्रमाणात वेतन बँकेत जमा होत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आयकर भरत नसल्याबाबतची नोटीस आयकर विभागाने बजावली असल्याची तक्रार केली असता हे प्रकरण समोर आले.

सदर बाब सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यासंपूर्ण प्रकरणाची दक्षता विभागाचे प्रमुख पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

Cidco news
Beed Crime News : भाजप नेत्याची दादागिरी; महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण, घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून पोलिसांच्या चौकशीत ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील त्याच्यावर विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. यासोबतच मागील 10 वर्षांचा ऑडिट करण्याचे आदेश देखील सिडको एमडी डॉ संजय मुखर्जी यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com