Nashik Dismissed Police Officer Death News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : लॉजवर बंद खोलीत आढळला बडतर्फ पोलिसाचा मृतदेह; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Nashik Dismissed Police Officer Death News : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याचा लॉजमधील बंद खोलीत संशयास्पद मृत्यू. नशेचा ओव्हरडोस, हृदयविकार की हत्या याचा पोलीस तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

  • लॉजमधील बंद खोलीत मृतदेह आढळला

  • अमली पदार्थ प्रकरणामुळे सात महिन्यांपूर्वी बडतर्फ

  • ओव्हरडोस की हत्या, मृत्यूचे गूढ कायम

नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याचा मृतदेह एका बंद खोलीत सापडला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. रफान मन्सूर शेख असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मृत रफान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रफान शेख यांना सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतरशनिवारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी उशिरा रफान शेख परराज्यातून नाशिकमध्ये परतले.

रात्री उशिरा भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील खोलीत पोलीस कर्मचारी रफान मन्सूर शेख यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला आणि रविवारी १ फेब्रुवारी रोजी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी इरफानच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने 'व्हिसेरा' राखून ठेवण्यात आला.

अतिनशेत हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणात अकस्मीत मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. रफान यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे. त्यांचे वडील नाशिक पोलिस दलातून निवृत्त झालेले असून, त्यांचे सख्खे व चुलतभाऊ शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. दरम्यान हा मृत्यू नशेच्या ओव्हर डोसमुळे हृदयविकाराने झाला की त्यांची हत्या करण्यात आली हे गूढ अद्यापही कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT