Workshop Manager Arrested for Molesting Minor Students Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: मित्रांसोबतचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग, कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावून विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य, जवळ बसवून...

Workshop Manager Arrested for Molesting Minor Students: अहिल्यानगरमध्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. कॉलेजमध्ये वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्यानेच हे कृत्य केले.

Priya More

सुशिल बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला. या महाविद्यालयामध्ये वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्याने विद्यार्थिंचा विनयभंग केला. याप्रकरणी विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दखल करत पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये वर्कशॉपचे काम करणाऱ्या अमित खराडेने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत गप्पा मारत बसलेले फोटो त्याने काढले होते. हे फोटो विभागप्रमुखांना दाखवून तुमचे शैक्षणिक नुकसान करेल अशी धमकी आरोपी विद्यार्थिनींना देत होता. वर्कशॉपमध्ये दोघींना बोलावून त्याने त्यांच्या विनयभंग केला. तसंच ही बाब कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती.

अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणारे अमित खराडेने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले होते. त्याने यामधील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलवून स्वतःच्या मोबाईल मध्ये काढलेले फोटो दाखवून हे फोटो तुमच्या विभाग प्रमुखाला दाखवले तर परीक्षेला बसवण्यासाठी अडचण येऊ शकते असा दम देऊन यातून मार्ग काढायचा असेल तर माझ्या जवळ बसा असे सांगितले. त्यानंतर त्याने या विद्यार्थिनींच्या शरीराला घाणेरड्यापद्धतीने नको त्या ठिकाणी स्पर्श केला. फक्त एकाच नाही तर दोन मुलींसोबत त्याने हे कृत्य केले.

ही घटना त्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर तिने थेट ११२ क्रमांकाला फोन करून घडलेली घटना सांगितली. ही घटना समजतात कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम अमित खरडेला ताब्यात घेतले. अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून अमित खरडे याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT