Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर हादरलं! एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्यांना अचानक लुळेपणा, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांना अचानक लुळेपणा व अशक्तपणा जाणवू लागल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

बुलढाण्यात एका रात्रीत नागरिकांना टक्कल पडत असल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात कुटुंबातील तीन चिमुकल्यांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आला आहे. एक ३० महिन्याचा, दुसरा ९ वर्षाचा आणि एक ११ वर्षे वयाचा अशा ३ बालकांना आजाराने कवटाळलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोग्य यंत्रणा हादरली असून तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील मौजे खंबाटवस्ती पाथ्री येथे एक ३० महिन्याचा, दुसरा ९ वर्षाचा आणि एक ११ वर्षे वयाचा अशा ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आला आहे. या तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे ही तिन्ही मुले नातेसंबंधात आहेत. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

सुरुवातीला ९ वर्षीय मुलाला १२ जुलै रोजी अचानक लुळेपणा, अशक्तपणा आला. आधी गावात उपचार घेतले. प्रकृती खालावत असल्याने मुलाला छत्रपती संभाजीनगरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १६ जुलै रोजी ११ वर्षीय मुलालाही याच कारणामुळे दाखल करण्यात आले. तर, ३० महिन्यांच्या बालकाला १७ जुलै रोजी उपचारासाठी भरती करावे लागले. यापैकी दोन मुलांवर आयसीयूत आणि ३० महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाटवस्ती पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आले.

या मुलांची आरोग्य विभागाने 'अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस' (एएफपी) संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. 'अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस'ची स्थिती ही पोलिओ, गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते. दरम्यान सध्या गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर थांबवला आहे. तसेच गावातील नागरिकांसाठी बाहेरून शुद्ध आणि निर्जंतुक केलेले पाणी सुरू करण्यात आले आहे. परंतु या चिमुकल्यांना कोणत्या आजाराने ग्रासले आहे हे अद्यापही समोर आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

देवाभाऊंच्या 'त्या' जाहिरातींवर तब्बल 40 ते 50 कोटी खर्च; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

Dhamaal 4: अजय देवदान, रितेश देशमुख, अर्शद वारसी पुन्हा येणार 'धमाल' करायला; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Maharashtra Live News Update: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत मर्दानी खेळाची परदेशी रंगत

Asia Cup 2025: आशिया कपआधी भारताला मोठा धक्का, महत्वाच्या खेळाडूला दुखापत; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT