Grandfather Arrested for Molesting Minor Granddaughter Saam Tv News
महाराष्ट्र

घरी कुणीही नव्हतं; नराधम आजोबाची नियत फिरली, नातीसोबत केलं असं काही की.., महाराष्ट्र हादरलं

Grandfather Arrested for Molesting Minor Granddaughter: हिंगोलीच्या औंढा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये आजोबांनी आपल्याच नातीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Bhagyashree Kamble

हिंगोलीच्या औंढा येथून आजोबा नातीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नराधम आजोबांनीच आपल्या नातीचा विनयभंग केला. घरात कुणीही नसताना आजोबानं हे भयानक कृत्य केलं. दरम्यान, याची माहिती चिमुकलीनं घरच्यांना दिल्यानंतर कुटुंबाची पायाखालची जमीन सरकली. त्यांना धक्का बसला. या प्रकरणी आजोबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ही संतापजनक घटना औंढा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये घडली. घटनेच्या दिवशी घरात कुणीच उपस्थित नव्हते. आजोबांची नियत फिरली. त्यांनी आपल्याच नातीचा विनयभंग केला. हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर चिमुकलीनं याची माहिती कुटुंबाला दिली. या प्रकरणाबाबत माहिती मिळताच त्यांना धक्का बसला.

चिमुकलीच्या कुटुंबियांनी थेट औंढा पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपी आजोबाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधा तक्रार दाखल केली असून, आजोबांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत दोन गटात हाणामारी, एकाला चाकूने भोसकलं

हिंगोली शहरात रात्री उशिरा दोन गटात शुल्क कारणावरून मारहाणीची घटना घडली. या घटनेत एका तरुणाला चाकू लागल्याने हा वाद अधिक चिघळला. दरम्यान जखमी झालेल्या तरुणावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, हिंगोली पोलिसांनी तातडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली पोलिसांनी घटनास्थळी देखील फौजफाट्यासह तात्काळ धाव घेतल्याने मोठा वाद टळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev: तुला पाहून मन वेडं झालं...

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला- शिवाजी सावंत

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; १६२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Silver Rate : सोन्यापेक्षा चांदीने भाव खाल्ला, किंमत ३ लाखांच्या पुढे

SCROLL FOR NEXT