Kolhapur Shocking Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: गालावर तीळ पाहून बायको समजला, मृतदेहावर अंत्यसंस्कार केलं; रक्षा विसर्जनावेळी 'ती' अवतरली, कोल्हापूरमध्ये नेमकं काय झालं?

Kolhapur Shocking News: कोल्हापूरमध्ये बेपत्ता झालेल्या पत्नीचा मृतदेह असल्याचे समजून एका व्यक्तीने अंत्यसंस्कार केले. पण रक्षाविसर्जन कार्यक्रमात बेपत्ता झालेली महिला अचानक आली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • गालावरील तीळ पाहून एका व्यक्तीने हा मृतदेह आपल्या बायकोचा असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले.

  • रक्षाविसर्जन कार्यक्रम सुरू असताना संबंधित महिला गावात आली आणि खळबळ उडाली.

  • मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेली महिला कोण होती? याचा शोध पोलिस घेत आहेत.

  • पोलिसांनी खातरजमा करून महिलेची ओळख पटवली आणि ती जिवंत असल्याची पुष्टी केली.

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीने मृतदेहाच्या गालावरील तीळ आणि गळ्यातील मंगळसूत्र समजून ही आपली बेपत्ता झालेली बायकोच असल्याचे समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण घडले मात्र विपरीतच. ज्या महिलेचा मृतदेह आपली बायको समजून त्याने अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक या व्यक्तीची बायको आली आणि आलेल्या सर्व नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले. घडल्या प्रकाराची चर्चा सुरु असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

जयशिंगपूर शहरातून ३७ वर्षीय महिला बेपत्ता झाली. जयसिंगपूर पोलिसांत बेपत्ता झालेल्या महिलेच्या नवऱ्याने याबाबत फिर्याद दिली. तब्बल १० दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजी बामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह पोलिसांना आढळला. खातरजमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या नवऱ्याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. अंगावरील खुणा आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचे सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला.

मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै-पाहुण्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी रक्षाविसर्जन कार्यक्रमाला या व्यक्तीचे नातेवाईक आले होते. या कार्यक्रमासाठी त्याच्या घरी खूप गर्दी झाली होती. कुटुंब दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपला महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि सगळं गाव चक्रावून गेले. आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळताच संबंधित महिला पुन्हा गायब झाली. त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला कोण? असे अनेक सर्वांना प्रश्न पडले आहेत.

घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून महिलेची शोधमोहीम गतिमान करण्यात आली. काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईलही सुरू झाला. पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली. मनधरणी करून तिला पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या बायकोच्याही गालावर होता. यावरून तो मृतदेह बायकोचा असल्याचे त्या व्यक्तीला वाटले. फक्त गालावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...म्हणूनच देवेंद्र फडणवीस-अमित शाहांनी लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं, मनोज जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Upvasache Modak Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा उपवासाचे मोदक, गणपतीला दाखवा स्पेशल नैवेद्य

Flipkart BBD Sale 2025: फ्लिपकार्ट Big Billion Days सेल लवकरच सुरू होणार, मिळणार डिस्काउंट्स आणि कॅशबॅक ऑफर्स

Jaya Bachchan : पापाराझींना पोज दिली अन् हसून साधला संवाद, जया बच्चन यांचा 'तो' VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT