HINGOLI WOMAN GETS ₹2.18 LAKH ELECTRICITY BILL; SMART METER SHOC saam tv
महाराष्ट्र

Shocking: लाईट बिल कसं भरू? सफाई कर्मचारी महिलेला आलं एका महिन्याचं 2 लाख 18 हजाराचं वीजबिल

Hingoli Woman Receives ₹2.18 Lakh Electricity Bill : हिंगोलीतील एका साफसफाई कर्मचारी महिलेला एका महिन्याचे तब्बल २ लाख १८ हजार रुपयांचे वीज बिल आल्याने खळबळ उडाली आहे. स्मार्ट मीटरनंतर वाढीव बिलाचा धक्का बसल्याचा आरोप केला जातोय.

Bharat Jadhav

  • कर्मचारी महिलेला २ लाख १८ हजार रुपयांचे वीज बिल आल्याची घटना

  • स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही वाढीव बिलांच्या तक्रारी

  • एका महिन्यात एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याने मीटर रीडिंग आणि बिलाच्या अचूकतेवर प्रश्न

संदीप नागरे, साम प्रतिनिधी

वीज बिलामध्ये पारदर्शकता यावी, वाढीव बिलांचा त्रास दूर व्हावा, यासाठी महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा रेटा करण्यात आला. मात्र, स्मार्ट मीटर नागरिकांना चांगलाच मोठा झटका बसत आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मार्ट मीटर नागरिकांच्या सोयीसाठी, हितासाठीच असल्याचे म्हटले होते. मात्र, नागरिकांना स्मार्ट झटका बसताना दिसून येत आहे. नागरिकांना वीजबिल अव्वाच्या सव्वा येत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हिंगोलीमधील एका महिलेला तर दोन लाख रुपयांचं बील महावितरण कंपनीनं पाठवलंय.

हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनवर साफसफाईचे काम करणाऱ्या एका महिलेला चक्क दोन महिन्यांचं वीज बिल तब्बल 2 लाख 18 हजार रुपये आलंय. प्रभावती सिद्धार्थ श्रावने असे या महिलेचे नाव आहे. त्या हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत. रेल्वे स्टेशनवर दरमहा 8 ते साडेआठ हजार रुपये पगारावर त्या साफसफाईेचे काम करतात.

आधी दर महिन्याला 700 ते 800 रुपये वीजबिल येत असल्याचे प्रभावती श्रावणे या महिलेने सांगितलं. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक 2 लाख 18 हजार रुपये भरा असा वीज वितरण कार्यालयाचा मेसेज श्रावणे यांना आला. वीजबिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन लाख 18 हजार रुपयांमध्ये काही प्रमाणात रक्कम कमी केली, मात्र आपल्याला दरमहा साडेआठ हजार रुपये महिना आहे तर माझ्या घरातील विजेच्या वापराचे नेहमी सातशे ते आठशे रुपये बिल येत असते. मग अचानक दोन लाख रुपयांचे बिल आल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

गंभीर बाब म्हणजे तातडीने वीज देयक भरा अन्यथा घराचा वीज पुरवठा खंडित करू असा संदेश मिळत असल्याने ही महिला वैतागलीय. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये पारदर्शकता येईल. ग्राहकांना वाढीव बिलांचा त्रास होणार नाही, असा दावा महावितरणकडून करण्यात आला होता. सिद्धार्थनगरमधील या घटनेमुळे स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही बिलांचा गोंधळ कायम असल्याच चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT