पनवेल : पनवेल तालुक्यातील माणघर, मोसारा, कुंडेवहाळ, भंगारपाडा येथील लोक सध्या कोल्ह्याच्या दहशतीने भयभीत आहेत. ही दहशत एवढी आहे की हा कोल्हा लोकांच्या घराजवळ वस्तीत येऊन दादागिरी अर्थात कोल्हेगिरी करत आहे. पनवेल (Panvel) तालुक्यातील ग्रामीण भागात कोल्हा हा प्राणी दिसून येतो. कोल्हा हा माणसाला घाबरणारा तसेच माणसाची चाहूल लागताच धूम ठोकणारा प्राणी आहे.
हे देखील पहा :
मात्र, सध्या या कोल्ह्याचे (Fox) कोणी काय बिघडविले आहे कोणास ठाऊक? तो सरळ-सरळ माणसांवर चाल करतोय. माणसांना घाबरणे सोडाच, लोकवस्तीत येऊन हा कोल्हा माणसांवर हल्ला करतोय. माणघर, मोसारा, कुंडेवहाळ, भंगारपाड्यातील 8 ते 10 जणांवर या कोल्ह्याने हल्ला केलाय. 8 ते 10 जखमींमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे.
या कोल्ह्याच्या हल्ल्यातील नागरिकांवर उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोल्हा हा प्राणी माणसाच्या वाटेला जात नाही. तो पिसाळल्यावरच माणसांवर हल्ला करतो. बहुतेक हा कोल्हा पिसाळला असावा त्यामुळे वनखात्याने तातडीने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.