Chhatrapati Sambhajinagar Video Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: हात-पाय बांधले, कुकरच्या झाकणाने गतिमंद विद्यार्थ्याला बेदम मारहाण; संभाजीनगरात धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये गतिमंद विद्यार्थ्याला शाळेतील शिपायाने बेदम मारहाण केली. हात-पाय बांधून कुकरच्या झाकणाने त्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • गतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात शिपाईकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

  • विद्यार्थ्याचे हात बांधून त्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केली

  • मारहाणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

  • या विद्यालयात पूर्वीही विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याची माहिती समोर

माधव सावरगावे, संभाजीनगर

गतिमंद विद्यार्थ्याला शाळेतील शिपायाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी येथील गतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयामध्ये हा प्रकार घडला. विद्यालयातील लहान मुलाला शिपाई दिपक इंगळे बेदम मारहाण करत असलेला व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात हा प्रकार घडला. या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळेने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, मुलाचे हात बांधून त्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केली जात आहे. फक्त इतकंच नाही तर या विद्यालयात इतर विद्यार्थ्यांनाही अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडेने देखील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचं आरोप करण्यात आले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहेत.

गतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ २०१८ मधील आहे. दोन महिने अगोदरच पुन्हा एका मुलाला बेदम मारहाण केल्याचा सीसीटीव्ही पोलिसांकडे जमा तक्रारीत नमूद आहे. सातत्याने मुलांना मारहाण होत असल्याची तक्रारदाराची माहिती आहे. पोलिसांकडे त्यासंबंधीचे सीसीटीव्ही दिले असल्याची तक्रारदार यांची माहिती आहे. गतिमंद निवासी विद्यालयाला ५० टक्के अनुदान आहे.

गतिमंद विद्यार्थ्यांवर होत असलेली ही अमानुष वागणूक समाजाच्या मनाला हादरा देणारी आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान हा प्रकार समोर कसा आला आणि याबाबत सर्वात आधी प्रशासनाकडे तक्रार करणारे प्रतिम घंगाळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुलांना होणाऱ्या मारहाणीसाठी जबाबदार देखील असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharvas Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरीच बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी खरवस

Eknath shinde : संख्याबळ मिळवा आणि विरोधीपक्षपद कमवा; विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दूसरा टप्पा मंजूर

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविना अधिवेशन|VIDEO

Maharashtra Travel : सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायचाय? 'हा' आहे महाराष्ट्रातील बेस्ट सनसेट पॉइंट

SCROLL FOR NEXT