latur  Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : महाराष्ट्र हादरला! बापाकडून झोपेत असलेल्या पोटच्या मुलीवर अत्याचार

Latur Crime news : लातूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. लातूरमध्ये बापाकडून झोपेत असलेल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूर : लातूरमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी घटना घटना घडली आहे. लातूरच्या देवणी तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. देवणीत जन्मदात्या बापानेच स्वत:च्या मुलीवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

लातूरच्या देवणी तालुक्यात नात्याला अक्षरशः काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. देवणीतील एका गावात 45 वर्षीय नराधम बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात झोपलेल्या अवस्थेत असताना नराधम बापाने भयंकर कृत्य केलं आहे. बापाने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर नराधम बापाने घरातून पळ काढल्याचे समोर आलं आहे.

नराधम बाप जबरदस्ती करताना पीडित मुलगी ओरडली. त्यानंतर मुलीची आई जागी झाली. त्यानंतर मुलीसोबत घडलेला प्रकार आल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता देवणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आंळदीत शिक्षकाचा विद्यार्थ्यांवर अत्याचार

पुण्यातील आळंदीत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आळंदीमध्ये खासगी शिक्षण संस्थेत वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने बाललैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bleeding Gums: दात घासताना हिरड्यांतून रक्त येतंय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर समस्येची सुरुवात

Maharashtra politics : राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा उभी फूट पडणार? 'एनडीए'चा मोठा प्लॅन

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update : पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी होणार खुलं

Petrol-Diesel Rate : पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी चेक करा नवीन दर; जाणून घ्या प्रमुख शहरांतील किमती

SCROLL FOR NEXT