mother sells her child for rs 10 thousand dharashiv saam tv
महाराष्ट्र

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Dharashiv News : धाराशीव जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर महिलेला दुसरं लग्न करायचं असल्यानं तिनं आपल्या पोटच्या मुलाला अवघ्या १० हजारांत विकल्याचा आरोप आजीनं केला आहे. या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी मागणीही तिने केली आहे.

Saam Tv

  • पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी महिलेनं विकलं मूल

  • १०० रुपयांच्या बाँडवर दत्तक करार करत १० हजार रुपयांना मूल विकले

  • नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा गंभीर आरोप

  • धाराशीवमधील घटना, सरकारी रुग्णालयाबाहेर गोंधळ

बालाजी सुरवसे, धाराशीव | प्रतिनिधी

Mother sells child for remarriage in Dharashiv district : एका आईसाठी तिचं मूल म्हणजे काळजाचा तुकडा असतो. पोटचा गोळा नुसता नजरेआड झाला तरी आईचा जीव तीळ तीळ तुटतो. पण आईच जर दगडाच्या काळजाची असली तर...? असाच काळीज पिळवटून टाकणारा एक धक्कादायक प्रकार धाराशीव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पहिल्या पतीचं निधन झाल्यानंतर दुसरं लग्न करायचं असल्यानं एका महिलेनं आपलं मूल दत्तक करार करून अवघ्या १० हजार रुपयांना विकल्याचा आरोप या चिमुकल्याच्या आजीनं केला आहे.

धाराशीव जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. फक्त शंभर रुपयांच्या बाँडवर दत्तक करार करून एका चिमुकल्याला त्याच्या आईनंच विकल्याचा आरोप आजीने केला आहे. दहा हजार रुपयांत मुलाची विक्री केल्याचं तिचं म्हणणं आहे. मुलाची आई आणि मामीनेच चाळीसगाव येथे नातवाची विक्री केल्याचा गंभीर आरोप करतानाच, या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आजीने केली आहे.

महिलेला दुसरं लग्न करायचं असल्यानं मूल विकलं?

मुलाला विकल्याचा आरोप ज्या महिलेवर करण्यात आला आहे, तिच्या पतीचं निधन झालं आहे. या महिलेला दुसरं लग्न करायचं आहे. त्यामुळं पहिल्या पतीपासून झालेलं मूल दत्तक देत असल्याचा आरोप या मुलाच्या आजीने केला आहे. यासंदर्भातील उल्लेखही दत्तक करारात करण्यात आल्याचंही तिचं म्हणणं आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनीही आरोप केले आहेत. मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी दत्तक करार केला असून, मुलाची विक्री केली आहे, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सूनेने नातवंडाला सोपवलं नसल्याने त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही आजीने केला आहे. सून आणि नातू घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रारही आजीने याआधी धाराशीवच्या मुरूम पोलिसांत दिली होती. त्यानंतर सूनेने दुसरे लग्न केले आणि नातवाला विकल्याचे समजले, असे आजीचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या मदतीनं मुलाचा ताबा घेतला

सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने मुलाचा ताबा मिळवला आहे. त्याला बालकल्याण समितीसमोर हजर केलं असून, सध्या त्याच्यावर धाराशीव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दत्तक करार करून ज्या दाम्पत्याला मूल विकले, त्या ठिकाणी मूल आजारी अवस्थेत आढळून आलं. तो तापाने फणफणलेला होता, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. मूल दत्तक प्रक्रिया बेकायदेशीर झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष बालकल्याण समितीच्या तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बालकल्याण समितीनं धाराशीव येथील शिशुगृहात मुलाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, मुलाला ताप आणि जुलाबाचा त्रास असल्यानं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती शिशुगृहाच्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान, मुलावर धाराशीवच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रुग्णालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते आणि मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Angina Symptoms: भारतीय महिलांच्या हृदय आरोग्यासाठी आवश्यक माहिती व उपाय

Nepal Protest: नेपाळमधील अस्थिरतेचा भारतावर काय होणार परिणाम? अर्थव्यवस्था अन् देशाची सुरक्षेवर संकट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह २० राज्यांना अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; बडा नेता भाजपच्या वाटेवर, समीकरण बदलणार?

Budget Earbuds: OPPO Enco Buds 3 Pro वर धमाकेदार ऑफर; त्वरीत करा ऑर्डर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT