Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

Ajit Pawar News : पुरोगामी विचारांचा वारसा चालवणाऱ्या अजित पवारांच्या घरासमोरच एक अघोरी प्रकार समोर आलाय. थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न झालाय. निवडणुकीच्या तोंडावर हा धक्कादायक प्रकार झाल्यानं चर्चेला उधाण आलंय. पाहूया एक रिपोर्ट

Bharat Mohalkar

हा भानामतीचा प्रकार घडलाय चक्कं बारामतीत... आणि तोसुद्धा अजित पवारांची सोसायटी असलेल्या सहयोग निवासस्थानाच्या बाहेर.... सोसायटीच्या मुख्य गेटजवळ जमिनीवर लिंबू, मिरची, काळे कापड, काही पूजेचे साहित्य आणि उतारा आढळला आणि एकच खळबळ उडाली... तर अजित पवारांना वशमध्ये आणण्यासाठी हा प्रकार घडल्याचा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय..

खरंतर राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु आहे... त्यातच अजित पवारांच्या सोसायटीसमोरच हा प्रकार घडल्यानं बारामतीत कुणाच्या विरोधात कट रचण्यासाठी, निवडणुकीत कुणाचे तिकीट कापण्यासाठी किंवा तिकीट पक्कं करण्यासाठी असा प्रकार केला असण्याचा संशय व्यक्त केला जातोय..

खरंतर महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, संत तुकाराम महाराजांचा वारसा आहे.. त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं...राज्यात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा करण्यात आलाय.. त्यानंतरही अंधश्रद्धेचा सोस कमी होत नाही.. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करुन अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांना आणि असं अघोरी कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: परदेशातील ६० लाखांची नोकरी सोडली; पती-पत्नीनं भारतात सुरू केला स्टार्टअप; आज महिन्याला कमावतात लाखो रुपये

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

SCROLL FOR NEXT