Shivsena wins osmanabad grampanchayat saam tv
महाराष्ट्र

Shivsena : चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवला, शिंदे गटाची एकाच ग्रामपंचायतीवर बाजी

११ पैकी ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजयाचा झेंडा फडकवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

उस्मानाबाद : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये विजयाची माळ गळ्यात टाकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत (shivsena) जोरदार राजकीय संघर्ष सुरु असल्याने राजकीय वर्तुळात निवणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उस्मानाबाद ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने गड राखला आहे. ११ पैकी ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर शिंदे गटाने फक्त एकाच ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. (Osmanabad Gram panchayat Election)

दरम्यान, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना त्यांच्या तुळजापूर मतदारसंघात एकाही ग्रामपंचायतवर विजय मिळवता आला नाही. मात्र, कळंब तालुक्यात भाजपने एका ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकवला. शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना देखील ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही. या तालुक्यात ठाकरे गटाने विजयाचा झेंडा फडकावत चार ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या आहेत.

तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक विकास आघाडीने सरशी केली आहे .काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही ग्रामपंचायत वर विजय मिळवता आला नाही. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतरही शिवसेनेने उस्मानाबादचा गड राखण्यात यश मिळवले आहे . त्यामुळे बंडखोरीनंतरही उस्मानाबाद मध्ये शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचे दिसते आहे.

जिल्हा : उस्मानाबाद

एकूण ग्रामपंचायत 11

ठाकरे गट : 04

शिंदे गट : 1

भाजप : 01

काँग्रेस : 00

राष्ट्रवादी : 00

मनसे : 00

इतर : 05 ( स्थानिक आघाडी)

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: भांडुपमधील एका सार्वजनिक शौचालयात सापडलं स्त्री जातीचं अर्भक

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT