ED Raids On Minister Anil Parab, Anil Parab News, Kirit Somaiya News
ED Raids On Minister Anil Parab, Anil Parab News, Kirit Somaiya News Saam Tv
महाराष्ट्र

Anil Parab: ईडीची मोठी कारवाई! अनिल परब यांची 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त; सोमय्यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

Gangappa Pujari

Mumbai: राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांंच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये त्यांची करोडोंची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. वर्षाच्या शेवटी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत नववर्षात अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे सुचक विधान केले होते. त्यानंतर आता अनिल परब यांच्याव ईडीने (ED) मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर रत्नागिरीमधील साई रिसोर्ट प्रकरणात ईडीने मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.याच प्रकरणात त्यांच्यावर मोठी कारवाई केली असून साई रिसॉर्टशी संबंधित दहा कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे.

त्याचबरोबर या प्रकरणात रत्नागिरीतील केबल व्यावसायिकांचीही चौ करण्यात आली आहे.त्याचबरोबर चौकशी करून ग्रामसेवक, तलाठी यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.

किरीट सोमय्यांनी पहिली प्रतिक्रिया..

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या मोठ्या कारवाईनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून "अनिल परब यांची संपत्ती जप्त झाली आहे, आधी संंपत्ती आता लवकरच परबही जप्त होतील," अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT