santsoh balid death in car accident  Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटावर कोसळला दु:खाचा डोंगर, जिल्हाप्रमुखाचे अपघाती निधन

Shiv Sena Santosh Balid Dies in Car Crash : नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराचे माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद यांचे मध्यरात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे.

Saam Tv

अजय सोनवणे, साम टीव्ही

मनमाड: संतोष बळीद हे नाशिक येथे विवाह समारंभ आटोपून लासलगाव मार्गे मनमाडला जात असताना वाहेगावसाळ शिवारात त्यांच्या कारचा अपघात झाला. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होत शेतात जाऊन आदळली. या भीषण अपघातात संतोष बळीद यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सहकारी गंभीर जखमी झाले.

या दुर्दैवी घटनेमुळे मनमाड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष बळीद यांच्या निधनाने एक लढवय्या शिवसैनिक गामावल्याची भावना मनमाड शहरातील लोक व्यक्त करत आहे. तसेच संतोष बळीद यांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. संतोष बळीद यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ

संतोष बळीद हे गेल्या 30 ते 35 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. तर त्यांनी अनेक जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्या प्रश्नांना वाचा फोडली होती. तर शिवसेना फुटीनंतर सुद्धा ते उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. शिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी चोख पद्धतीने पार पाडली असे स्थानिक कार्यकर्ते सांगतात तसेच त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाची बांधणी केली होती. कट्टर बाळसाहेबांचे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. संतोष बळीद हे वीजग्राहक संघटनेच्या माध्यमातून सामान्य जनतेशी जोडले गेले होते. शेकडो आंदोलने, प्रसंगी अंगावर गुन्हे नोंदवून घेत त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले.संतोष बळीद हे माजी आमदार राजेंद्र देखमुखांचे स्वीय सहाय्यक देखील होते.

अर्ध्या रात्री धावून येणारा नेता हरपला!

मानमाड शहरातील नागरिक, विशेषतः माता-भगिनी, अनेकदा वीजबिलांशी संबंधित तक्रारी घेऊन संतोष भाऊंकडे यायच्या. सर्वांसोबत अतिशय नम्रपणे संवाद साधणारे संतोष भाऊ बळीद अन्यायाविरुद्ध लढताना मात्र सरकारी अधिकाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका घेत असत. नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेकदा संघर्ष केला आणि त्यासाठी गुन्हेही स्वेच्छेने स्वीकारले.अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांसाठी, नागरिकांसाठी कुठल्याही वेळी, अगदी अर्ध्या रात्रीही धावून जाणारा, प्रामाणिकपणा आणि साधेपणा जपणारा खरा नेता आज हरपल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT