Sanjay Raut News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: थापेबाजीला अंत नाही; ३७० कलम हटवून फक्त राजकारण... संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Gangappa Pujari

Saamana Editorial News:

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काश्मिरमधील सद्यस्थितीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कलम ३७० हटवून काश्मिरी पंडितांना काय मिळाले?  रामास मंदिर मिळाले पण पंडितांचा वनवास आणि तंबूतले जगणे कायम आहे, असा टोला लगावत संजय राऊत यांनी सामनामधून नोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय आहे सामना अग्रलेख?

"जेथे जातील तेथे आपले लाडके पंतप्रधान बिनधास्त खोटे बोलतात. 10 वर्षांची ही अखंड परंपरा आहे. खोटे बोलण्यास धाडस लागते. पंतप्रधान मोदी यांच्याकडे हे इतके धाडस येते कोठून? हा प्रश्न आपल्या देशवासीयांना पडला आहे. मोदींनी राजकीय थापेबाजी भरपूर करावी, पण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित विषयांवर तरी खोटे बोलू नये ही किमान अपेक्षा आहे. पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही," असा आरोप सामनामधून करण्यात आला आहे.

तसेच "पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले व त्यांच्या हौतात्म्याचे राजकारण करून भाजपने लोकांकडे मते मागितली, पण हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर श्रीमान मोदींचे मौन आहे. बालाकोटवर झालेला सर्जिकल स्ट्राईकही संशयाच्या भोवऱ्यात आहे. असा कोणताच 'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तानवर झाल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याचे आता समोर आले," असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

"370 कलम हटवून मोदी सरकारने फक्त राजकारण केले. 'हिंदू' म्हणून पंडितांना काहीच लाभ झाला नाही. कोणतेही 'पॅकेज' नाही, कोणतेही लाभ नाहीत. सुरक्षा तर नाहीच. कश्मीरातून पलायन करून सरकारी नोकरीतील जे पंडित जम्मूस गेले त्यांचे पगारही रोखले. पंडितांची कुटुंबे त्यामुळे अडचणीत आली. राज्याच्या बजेटमधील 2.5 टक्के हिस्सा पंडितांच्या पुनर्वसनावर खर्च व्हावा हे निर्देश प्रत्यक्ष अमलात आलेच नाहीत. 370 कलम हटवल्यानंतरही कश्मीर खोऱ्यातील अशांतता, अस्थिरता, पंडितांचा वनवास आणि सैनिकांवरील हल्ले कायम आहेत. मग मोदींनी केले काय? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT