Sushma Andhare
Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare : 'विषय संपला नाही, त्यांना जागा दाखवू..' नाशिकच्या अधिवेशनात सुषमा अंधारेंचा इशारा

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, नाशिक|ता. २३ जानेवारी २०२४

Sushma Andhare Speech:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. राज्यभरातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेदरम्यान बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"हे अधिवेशन नाशिकमध्ये (Nashik) होत आहे. नाशिक अनेक गोष्टीसाठी हे प्रसिद्ध आहे. एमडी ड्रॅग्ज आणि ललित पाटिलसाठी हे नाशिक प्रसिद्ध आहे, असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. तसेच नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे, कारण पुन्हा शिवसेना सत्तेत येण्याची नांदी आहे," असा विश्वासही सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.

"भारतीय जनता पक्षाचे (BJP) मोठे नेते आरोप करतात. ७० हजार कोटींचा उल्लेख करतात, आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांच्यात येतात. सुषमा अंधारेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. रामाला आणले पण तुम्ही रामराज्य आणू शकत नाही," असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागा दाखवू..

यावेळी बोलताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटासह भाजप आरएसएसवर सडकून टीका केली. वारुळ मुंग्या बनवतात पण त्यात विषारी नाग राहतो. "आरएसएसने असे सत्तेचे वारुळ केले पण त्यात त्यांना राहण्याचे भाग्य नाही त्यात हे भ्रष्टाचारी आहेत. आमची जेलमध्ये जायची,गोळ्या झेलायची तयारी आहे. विषय संपला नाही. विषयाला आता सुरूवात झाली आहे. एकेकाला जागा दाखवू आणि पाडून दाखवू,.." असा इशाराही अंधारे यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweets Disadvantages: जास्त बर्फी खाणं पडेल महागात, आरोग्यसाठी आहे घातक

Shruti Marathe : नजर ना लागो या सौंदर्याला; श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Anayadikuthu Waterfalls : डोळ्यांचं पारणं फेडणारा अनायादिकुथु धबधबा

Photo : हाथरसमधील दुर्घटनेनंतर राहुल गांधींनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

Marathi Live News Updates: माकपची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी

SCROLL FOR NEXT