Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare News:'भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या...' महाडच्या सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Shivsena Thackeray Group Leader: उद्धव ठाकरे यांची रायगडच्या महाडमध्ये शिवगर्जना सभा सध्या सुरू आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Sushma Andhare: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांची भेट घेतली. ज्यानंतर ते महाडकडे रवाना झाले. उद्धव ठाकरे यांची रायगडच्या महाडमध्ये शिवगर्जना सभा सध्या सुरू आहे. सभेतून उद्धव ठाकरे कोणावर हल्लाबोल करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

काय म्हणाल्या सुषमा अंधारे...

यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी "महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये माझे म्हणणे मांडत असताना मी सत्याचाच आग्रह धरला पाहिजे आणि सत्याचा आग्रह हा आहे की अदानीचे 20 हजार कोटी कुठून आले?" असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच जेव्हा कधी भाजप अपयशी ठरते तेव्हा ते कधी महापुरूषांच्या, कधी सावरकरांच्या तर कधी धर्माच्या मागे लागतात, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखेच काही नसते, "असेही त्या यावेळी म्हणाल्या.

तसेच "एमआयडीसीमधील भंगार विकून खाणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी महाडवासियांना केले. मडाड एमआयडीसीमधील यांची दादागिरी मोडून काढा असेही त्या म्हणाल्या. बारसू रिफायनरी प्रकरणात आम्ही भूमीपुत्रांसोबत आहोत. कारण आमचं हिंदुत्व चुली पेटवणार आहे,दंगली पेटवणारे नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली...

राणे पिता पुत्रांवर हल्लाबोल...

यावेळी सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यासह नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. मी राणे साहेब आणि त्यांच्या पोरांना जास्त सिरीयसली घेत नाही ,ते भाजपची चाकरी करत आहेत, आणि हे करताना ते आम्ही किती खालची पातळी गाठू शकतो हे दाखवत आहेत, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली..

राज ठाकरेंना डिवचले....

दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच राज ठाकरे यांचीही आज रत्नागिरीत सभा आहे. त्यावरुनही सुषमा अंधारे यांनी एक मिमिक्री आर्टिस्ट रत्नागिरीत उभा आहे, असे म्हणत खोचक टीका केली. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT