Sanjay Raut Criticized Narendra Modi Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut On Narendra Modi: संविधानासमोर नतमस्तक झालेले मोदी ढोंगी, संजय राऊत यांचा निशाणा

Priya More

'संविधानासमोर नतमस्तक झालेले मोदी ढोंगी' असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. नरेंद्र मोदींची तिसरी टर्म ही फक्त व्यापाऱ्यांसाठीच असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी शुक्रवारी संसदेमध्ये संविधानासमोर नतमस्तक झाले होते. यारूनच संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट निशाणा साधला.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले. मात्र निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजपचीच लोकं वारंवार जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा करत होते. याचाच फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसला. नरेंद्र मोदींची ही कृती म्हणजे नाटक आणि ढोंग असून संविधान बदलण्याची भाषा करण्यांना लोकांनी झिडकारलं. त्यानंतर त्यांना संविधानाची प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मी आभार मानतो.' अशा शब्दात संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

त्याचसोबत संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'नरेंद्र मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट, व्यापाऱ्यांच्या आणि सरकार बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी आहे हे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी या मुद्द्यांवर अजूनही मौन आहे. मोदी-शहा शेअर बाजारावर बोलत असून हे सरकार कार्पोरेट, उद्योगपती, व्यापारी यांच्यासाठी आहे. हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन सरकार बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे सरकार टिकणार नाही.', अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

तसंच, 'हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलत आहेत. हे मी निकाल लागल्यापासून बोलत आहे की हे सरकार टिकणार नाही. कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहिती आहे. त्यांचे चेहरे बघा त्यांचा चेहरा सांगत आहे. म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात करायचा, आपल्याबरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा, लाखो -करोडो हजारो-शेकडो कोटी रुपयांचा चुना लावायचा आहे हे यांचं धोरण दिसत आहे.', अशी देखील टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT