Narendra Modi - Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Saamana Editorial: 'जुन्या संसदेत १० वर्षांपेक्षा जास्त काळ कोणी टिकत नव्हतं; म्हणून नवी संसद..' सामनातून भाजपवर टीकास्त्र

Saamana Editorial On New Parliament Building: किमान 50 ते 100 वर्षे मजबुतीने उभे राहील असे संसद भवन असताना नव्या संसद भवनाचा घाईघाईने केलेला हा अट्टहास कशासाठी? असा सवालही सामनामधून विचारण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Saamana Editorial News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसदेचे थाटामाटात उद्घाटन झाले. विशेष अधिवेशनही नव्या संसदेत पार पडले. एकीकडे नव्या इमारतीत संसदेचे कामकाज सुरू झाले असतानाच विरोधकांनी मात्र यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे.

काय आहे सामना अग्रलेख...

राजधानी दिल्लीतील (Delhi) हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान शंभर वर्ष त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक 'संसद भवनाला टाळे लावले व त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले. 20 तारखेला विशेष अधिवेशनासाठी मी नव्या संसद भवनात पोहोचलो तेव्हा बाहेर व आत एकंदरीत गोंधळाचेच चित्र होते.

जुन्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी लोकसभा तसेच राज्यसभेसाठी स्वतंत्र भव्य दरवाजे होते. लोकसभेसाठी इतर 'दोन' दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच 'दार'. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते.

दिल्लीचे सरकार अंधश्रद्धा व अंधभक्तांच्या वर्तुळात

आणखी किमान 50 ते 100 वर्षे मजबुतीने उभे राहील असे संसद भवन असताना नव्या संसद भवनाचा घाईघाईने केलेला हा अट्टहास कशासाठी? दिल्लीतील वर्तुळात यावर ज्या चर्चा सुरू आहेत त्या मनोरंजक आहेत. दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा व अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. देश चालवणाऱ्यांच्या मनावर अंधश्रद्धा, ग्रह, कुंडलीचा पगडा आहे. “सध्याचे संसद भवन दहा वर्षांनंतर तुम्हाला धार्जिणे नाही.

ज्योतिषी सल्ला मानून संसदेची उभारणी....

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ येथे कोणी टिकत नाही. त्यामुळे नव्या संसद भवनाची उभारणी करा" असा ज्योतिषी सल्ला मानून नव्या संसद भवनाची उभारणी 2024 च्या आधी केली. नवी वास्तू गोमुखी असावी असा त्या ज्योतिषाचार्याचा आग्रह होता. त्यानुसार नवी वास्तू झाली. एका बाजूला आपल्या वैज्ञानिकांनी चंद्रावर यान उतरवलं व त्याच देशाचे राज्यकर्ते सत्ता जाऊ नये या अंधश्रद्धेतून नवे संसद भवन उभारतात हे चित्र चांगले नाही.

संसद भाजपचे प्रचारकेंद्र...

संसदेतील प्रेक्षक गॅलऱ्या यावेळी ठरवून गच्च भरवल्या गेल्या. महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना दिल्लीतील शाळांतील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांना बसेस भरून संसदेत आणले. या सर्व शाळा संघ परिवाराशी संबंधित होत्या हे नंतर समजले.

नवे संसद भवन हे भाजपचे जणू मुख्यालय, प्रचार केंद्र बनले. प्रेक्षकगृहात जाणाऱ्या महिलांकडून 'मोदी झिंदाबाद'चे नारे नव्या संसद भवनात देण्यात आले. हे यापूर्वी कधी घडलं नाही. जुनी संसद हे सर्व हतबलतेने पाहत उभी आहे, पण बोलायचे कोणी? दिल्लीत ज्योतिषाचार्य व बुवा-बाबांची चलती आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT