Shivsena Thackeray Group Adhivseshan Nashik Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'मोदी फक्त दोघांनाच घाबरतात, शेतकरी अन् ठाकरे...' नाशिकच्या महासभेत राऊतांची फटकेबाजी

Shivsena Thackeray Group Adhivseshan Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

अभिजीत सोनावणे

Sanjay Raut Speech Nashik:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी राममंदिर उद्घाटन सोहळ्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत?

"ही प्रचंड विराट सभा आहे. अयोध्येतून प्रभू श्रीराम आपल्याला आशीर्वाद देत आहेत. प्रभू श्री राम सत्यवचनी होते, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) खोटं बोलतात. मोदींनी नाशिकला काळाराम मंदिरात साफसफाई केली, हे काय ढोंग आहे. साफसफाई करणे तुमचं काम नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात.." असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

निवडणुका आल्या की रडतात...

"राममंदिर झाल्यानं सर्व आनंदी होते, हा माणूस रडत होता. निवडणूक आली की हा माणूस रडतो. पुलवामा झाले तेव्हा मोदी रडले नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा मोदी रडले नाहीत. मात्र काल रडले, रडता कशाला आनंदाचा क्षण आहे ना? असे म्हणत राममंदिरनिमित्त घरोघरी अक्षता वाटल्या.अरे अक्षता काय वाटताय, आमचे १५ लाख द्या. २०१४ साली तुम्ही सांगितलं होत ना, ते १५ लाख वाटा आम्ही वाट पाहतोय.." असा टोला राऊतांनी लगावला.

शिवसेना एकच..

परवा मोदी नाशिकमध्ये (Nashik) आले. अन् काय केल? शेतकऱ्यांना अटक केली. असे जुलमी राज्य उलथवून टाका. उद्धव ठाकरे यांना राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व द्यायचे आहे. ही शिवसेना मिध्यांची नाही. शिवसेना एकच आहे, ही खरी शिवसेना बाळासाहेबांची आहे. देशात मोदी फक्त दोघांनाच घाबरतात. शेतकरी आणि ठाकरे," असेही राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT