Bharat Gogawale Video  Saam TV
महाराष्ट्र

Bharat Gogawale Dandiya Video : 'लोगों को कहने दो, कहते ही रहने दो...', भरत गोगावलेंनी गाजवला दांडिया कार्यक्रम, भन्नाट डान्स व्हायरल

Bharat Gogawale Garba Video : गुरुवारी रात्री आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये अनेक नवरात्रोत्सव मंडळांना भेट दिली.

प्रविण वाकचौरे

सचिन कदम

Bharat Gogawale Dance VIdeo :

शिवसेना शिंदे गटाचे सतत चर्चेत असलेले महाडचे आमदार भरत गोगावले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मंत्रिपद किंवा राजकीय वक्तव्यासाठी भरत गोगावले चर्चेत नाही तर दांडिया डान्समुळे ते चर्चेत आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरात्रौत्सवामुळे सध्या सगळीकडेच दांडिया, गरबाची धूम आहे. राजकीय नेतेही आपल्या मतदारसंघातील अशा कार्यक्रमांना आवर्जुन भेट देत आहेत. भरत गोगावले यांनी देखील महाडमध्ये दांडिया कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी भरत गोगावली यांनी केवळ दांडिया पाहण्याचा नाहीतर खेळण्याचाही आनंद लुटला. त्यांचा दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये परदेसिया ये सच है पिया... या गाण्यावर ठेका धरताना आमदार गोगावले दिसत आहेत. (Latest Marathi News)

गुरुवारी रात्री आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये अनेक नवरात्रोत्सव मंडळांना भेट दिली. या दरम्यान विशानेमा गुजराथी समाजाच्या गरब्याच्या कार्यक्रमामध्ये आमदार महोदयांनी फेर धरला. आपल्या नेत्याचा गरबा डान्सचा व्हिडीओ कार्यकर्त्यांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आमदार भरत गोगावले यांचा दांडिया खेळतानाचा व्हिडीओ आपल्या स्टेटसला ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT