Uday Samant On Raj Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Uday Samant On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय, उदय सामंत यांचे स्पष्ट मत

MNS Padwa Melava: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी मत व्यक्त केले.

Priya More

Uday Samat On Uddhav Thackeray:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाचा आज शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याचे (MNS Gudipadwa Melava) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीमध्ये जाणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी मत व्यक्त केले.

राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की, 'राज ठाकरे स्वतःचा पक्ष चालवतात. त्यामुळे त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे. ते महायुतीत आले तर नक्की स्वागत आहे. मी एवढा मोठा नेता नाही की या सगळ्या संदर्भात काही बोलू शकेलं. पण राज ठाकरे महायुतीत आले तर आनंद होईल.' राज ठाकरे जर महायुतीत आले तर आनंद होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर उदय सामंत यांनी टीका केली आङे. ते म्हणाले की, 'आमचा सामना तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर नाहीच. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्मिक भाषेत संगीतलं. जगाने मान्य केलं की शिवसेना कोणाची हे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सांगितलं. उबाठाच्या नेत्यांनी 35 जागा येतील असं सांगीतलं. मला वाटते ते चुकीने बोलले असतील. त्यांनी देशभरात उपस्थित जागा येतील असं त्यांना म्हणायचं असेल.' तसंच उदय सामंत यांनी 45 पारचं उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल याची खात्री असल्याचा दावा केला आहे.

त्याचसोबत, 'लोकशाहीत जेव्हा आघाडी होते तेव्हा जागावाटत मागेपुढे होत असतात. महाविकास आघाडीमध्ये प्रदेशाध्यक्षांनी आजही मी नाराज आहे असं सांगितलं. त्यामुळे तशी परिस्थिती आमच्या महायुतीत नाही. तिन्ही नेते एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना टीका करण्याची कुठली संधी मिळणार नाही.', असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ही एक चूक पडू शकते महागात, मिळणार नाही ₹२०००;लगेच चेक करा अपडेट

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Kalyan Local : धक्कादायक! लोकलमध्ये महिलांचा बेक्कार वाद, एकीने दुसरीच्या दंडाचा कचकन चावा घेतला अन्...

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Ahilyanagar Tourism : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

SCROLL FOR NEXT