Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: 'शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पळविणाऱ्या व्यापाऱ्याच्या मदतीला रविकांत तुपकरांची पत्नी? शिंदे गटाने असा गंभीर आरोप का केला?

Ravikant Tupkar News: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची वकील पत्नी एड शर्वरी तुपकर यांनी व्यापाऱ्याला एका प्रकरणात मदत केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील तब्बल 300 शेतकऱ्यांच्या शेतमालाचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या हरदेव ट्रेडर्सच्या संतोष गाडे आणि अंकुश गाडे यांना वाचवण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची वकील पत्नी एड शर्वरी तुपकर समोर आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिंदे गटाच्या आरोपामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर रविकांत तुपकारांशी संपर्क केला असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन चिखली येथे पत्रकार परिषद घेतली. रविकांत तुपकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत.

'एकीकडे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी केवळ आव आणत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या गाडे बंधूंना वाचवण्यासाठी न्यायालयात नादारीचे प्रकरण दाखल केले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी पत्रकार परिषेदेमध्ये करण्यात आला आहे.

त्यामुळे रविकांत तुपकरांच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या संपूर्ण गंभीर प्रकरणी काहीतरी काळबेर घडलं असल्याची शंका सुद्धा शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या आरोपामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आरोपांना रविकांत तुपकारांकडून पत्रकार परिषदेत काय स्पष्टीकरण देण्यात येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT