Mansi Dalvi 
महाराष्ट्र

'त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने सेनेत मतभेदच्या वावड्या'

साम टिव्ही ब्युरो

या प्रकरणामुळे तालुक्यात शिवसेना आणि शेकाप यांचा कलगीतुरा आगामी निवडणुकी आधीच रंगला आहे.

- राजेश भोस्तेकर

अलिबाग : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधीच एकमेकांचे शत्रू असलेले शेकाप आणि शिवसेना यांच्यात आता कलगीतुरा सुरू झाला आहे. शिवसेनेतर्फे शिवतीर्थावर भगवा फडकविण्यासाठी आमदार महेंद्र दळवी याच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अलिबाग तालुक्यात कंबर कसली आहे. तालुक्यात वाढत असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाने शेकापच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे शेकापकडून शिवसेनेच्या आमदारावर शिवसैनिक नाराज असल्याची बदनामी स्वतःच्या मुखपत्रातून केली जात आहे. शिवसेना आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या मागे शिवसैनिकांची पूर्ण ताकद उभी असून शिवसेनेत कोणीही नाराज नसल्याचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीत शेकापला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व नेतेमंडळी एकत्र आली असल्याचेही राजा केणी यांनी म्हटले आहे. राजीपच्या शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनीही शेकाप नेत्यावर आरोप केले आहेत. alibag political news shivsena shetkari kamgar paksha

अलिबाग तालुक्यातील कुर्डुस हा जिल्हा परिषद गट शेकापकडे आहे. आमदार महेंद्र दळवी याच्या माध्यमातुन अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांनी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात फडकविण्यासाठी केणी यांनी कंबर कसली आहे. कुर्डुस मतदारसंघात वाढत असलेली शिवसेना ही शेकापला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत डोकेदुखी ठरणार आहे. नुकताच कुर्डुस गटाची शिवसेनेच्या प्रमुखांची बैठक आमदार महेंद्र दळवी याच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत शिवसैनिकांनी आपली मते मांडली. मात्र शेकापच्या मुखपत्रात शिवसैनिक हे आमदारावर नाराज असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली असून अपप्रचार सुरू केला. याबाबत अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी चाळमळा येथे आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन शेकापचे हे आरोप फेटाळले असून शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत. अलिबाग तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरू असल्याने शेकापच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे केणी यांनी म्हटले आहे. यावेळी राजीप शिवसेना गटनेत्या मानसी दळवी उपस्थित होत्या. शिवसेनेची बदनामी करणाऱ्या वृत्तपत्राची शिवसैनिकांनी होळी केली आहे.

आमदार महेंद्र दळवी याच्या माध्यमातून अडीच वर्षात संकट काळ असूनही रस्ते, पाणी प्रश्न तसेच विविध विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. ४० वर्ष शेकापची सत्ता असतानाही मतदारसंघात अद्यापही विकास झाला नाही. आंबेपुर ग्रामपंचायतीच्या शेकापच्या सरपंच सुमना पाटील यांनी जेएसडब्लू कंपनीच्या सीएसआर फंडातून मिळालेल्या २५ लाखात व्यायाम शाळा बांधली. सार्वजनिक हितासाठी सीएसआर फंड हा वापरला जात असताना व्यायाम शाळेतून मिळणारा निधी हा ग्रामपंचायतीकडे वर्ग करणे गरजेचे आहे. मात्र त्यातून स्वतःच उत्पन्न गोळा करीत आहेत असा आरोप मानसी दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

शेकापतर्फे अलिबाग रोहा रस्त्यासाठी आंदोलन केले. हा रस्ता मंजूर असून त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. मात्र पूल, पर्यायी रस्ता या कामासाठी काम सुरू झालेले नाही. आमदार महेंद्र दळवी यांनी या रस्त्यासाठी ठेकेदार याच्याकडे पैशाची मागणी केली असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. केलेले आरोप सिद्ध करा असे आव्हान मानसी दळवी यांनी केले आहे. अलिबाग मुरुड हा रस्ता माजी आमदार पंडित पाटील यांच्या कंपनीला मंजूर झाला आहे असे असताना अजूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. याबाबत शेकाप नेते गप्प का असा सवालही पत्रकार परिषदेतून दळवी यांनी उपस्थित केला आहे.

edited by : siddarth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

SCROLL FOR NEXT