किल्ले रायगड प्रमाणे आता कुलाबा किल्यातही मार्गदर्शक तरुण कुलाब्याचा इतिहास पर्यटकांसमोर कथन करणार आहे. त्यामुळे किल्याला भेट देणाऱ्या पर्यटकासमोर साडे पाचशे वर्षाचा इतिहास शब्दरूपाने डोळ्यासमोर उभा राहणार आहे.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग : अलिबाग समुद्रात अष्टगराचा राजा असलेला कुलाबा किल्ला आजही साडेपाच वर्षांपासून इतिहासाची साक्ष म्हणून उभा आहे. अलिबागमध्ये पर्यटनांस येणारा पर्यटक हा आवर्जून कुलाबा किल्यास kolaba fort नक्की भेट देतो. परंतु कुलाबा किल्याचा इतिहास नक्की काय आहे हे अनेक पर्यटकांना कळत नाही. कारण त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी कोणीच मार्गदर्शक किल्यात उपलब्ध नाही. त्यामुळे येणारा पर्यटक हा किल्याची तटबंदी, मंदिर आणि आतील परिसर पाहून निघून जातो. kolaba-fort-alibag-youth-will-guide-tourists-marathi-news-sml80
आता कुलाबा किल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना या किल्याचा नक्की काय इतिहास आहे, आतून तो कसा आहे, किल्यात काय आहे याची इंतभूत माहिती ही मार्गदर्शकामार्फ़त (गाईड) मिळणार आहे. यासाठी टुरिझम विभाग, बँक ऑफ इंडिया आणि पुरातत्व विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील २२ स्थानिक युवकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे स्थानिक युवकांना रोजगारही मिळणार आहे तसेच कुलाबा किल्याचा शब्दरूपी इतिहास पर्यटकांसमोर उभा राहून पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
अलिबाग हा पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. अलिबागचा विस्तीर्ण समुद्र किनारा, नारळी फोफळीच्या बागा, नैसर्गिक सौदर्य याचा आनंद पर्यटक घेत असताना समुद्रात असणारा कुलाबा किल्याला आवर्जून भेट देतात. कुलाबा किल्यात उजव्या सोंडेचा सुवर्ण पंचायतन गणपती मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, दर्गा, इतिहासकालीन तोफा, गोड्या पाण्याच्या विहीर, अंधारवाव, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण, कान्होजी आंग्रे घुमटी, सर्जेकोट यासह अनेक वास्तू इतिहासाची साक्ष म्हणून आहेत. मात्र ही सर्व ठिकाणे नक्की कुठे आहेत, किल्याचा इतिहास काय आहे याबाबत आलेल्या पर्यटकांना माहिती नाही. त्यामुळे पर्यटक हा किल्याचे बुरुज, आत असलेल्या गणरायाचे दर्शन आणि परिसर पाहून निघून जातो. त्यामुळे किल्याच्या आतील इंतभूत माहिती पर्यटकाला मिळत नाही.
जिल्ह्यातील गड किल्याचा इतिहास, आतील वास्तूचे महत्व हे येणाऱ्या पर्यटकाला इतिहासप्रेमींना कळणे महत्वाचे आहे. यासाठी पुरातत्व विभाग, टुरिझम विभाग आणि बँक ऑफ इंडिया याच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील २२ स्थानिक युवकांना तसेच २ महिलांना कुलाबा किल्याची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यात आली.
कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी या सर्व प्रशिक्षितांना कुलाबा किल्याची आणि परिसराची माहिती कुलाबा किल्ला परिसर फिरून दिली. या युवकांना किल्ल्यातील प्रत्येक भागाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षितांच्या माध्यमातून आता कुलाबा किल्याचा इंतभूत इतिहास पर्यटकांना सांगितला जाणार आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.