Shiv Sena And NCP MLA Disqualification Case  Saam Tv
महाराष्ट्र

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर! ठाकरे गट, अजितदादांच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी सुनावलं

NCP Shivsena MLA Disqualification Case Supreme Court: एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा, अशा मागणीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली, ज्यावर आज सुनावणी होणार होती.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ६ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वकिलांनी कागदपत्राच्या पुर्ततेसाठी वेळ वाढवून मागितली, ज्यानंतर कोर्टाकडून ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. या सुनावणीवेळी सरन्यायाधिशांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वकिलांना चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले.

आमदार अपात्रतेचा निकाल पुन्हा लांबणीवर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र न केल्याने दोन्ही ठाकरे गट तसेच शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा, अशा मागणीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली, ज्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र कागदपत्रांची पुर्तता नसल्याने ही सुनावणी दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.

अजित पवार गटाला दोन आठवड्यांची वेळ

सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख (मेंशन) कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळं या प्रकरणाची सुनावणी आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट, अजित पवारांच्या वकिलांना फटकारले

यावेळी कोर्टामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वकील आणि सरन्यायाधीशांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला याप्रकरणाला विलंब लागतो आहे, तुम्ही लवकर तारीख द्या, अशी विनंती केली. यावर कोर्टाने त्यांना तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा, असे म्हणत फटकारले.

सुनावणीत काय घडलं?

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटालाही कोर्टाने खडेबोल सुनावले. राष्ट्रवादीला वेळ वाढवून दिला आहे. दोन आठवड्यात मुख्य वकिलांनी तयारी पूर्ण करावी, तुमचे मुख्य वकील कोण आहेत? असा सवाल कोर्टाने विचारला. यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी अद्याप सूचित नाही, विधानसभा निवडणूक जवळ आल्यात, शुक्रवारपर्यंत मुख्य वकिलांची नियुक्ती करु असे सांगितले. यावर कोर्टाने संताप व्यक्त करत तुम्ही आम्हाला आदेश देऊ नका, पुढील आठवड्यात गुरूवारपर्यंत वेळ देत आहोत, असे म्हणत दादांच्या वकिलांना खडसावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT