रत्नागिरी: राज ठाकेरेंच्या कालच्या उत्तर सभेनंतर राज्यातून पुन्हा एकदा टीकेची लाट आली आहे. काल राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शरद पवार, सुप्रिय सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज राज्यभरातून राज ठाकरेंवरती (Raj Thackeray) नेते पलटवार करत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. राज ठाकरे मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक पाहून भाजपची तळी उचलत आहेत. मुंबई मनपा आली की मनसे सुपारी घेते अशी जहरी टीका राऊतांनी केली होती. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. (Vinayak Raut on Raj Thackeray)
RSS ने मुंबई महापालिकेला लिहिलेल्या पत्रावर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. RSS ला इतक्या वर्षानंतर जाग का आली? हा संशोधनचा विषय आहे. मुंबई मनपा याबाबत योग्य तो निर्णय घेईल. बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थल हे राज्यतील शिवसैनिक यांचे भक्ती स्थान आहे. मुंबई महापालिका यावर योग्य तो निर्णय घेईल असे विनायक राऊत म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाविषयी माहिती दिली ते म्हणाले ''नाणार प्रकल्प स्थानिकांना डावलून होणार नाही. रिफायनरीबाबत धोपेश्वर ग्रामपंचायतच्या ठरवाचा विचार केला जाईल''.
दरम्यान काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा ठाण्यामध्ये पार पडली. गुढीपाडव्याचे भाषण झाल्यानंतर राज ठाकरेंवरती महाविकास आघाडीचे नेते टीका करत होते. त्यांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले. या सभेत त्यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अजित पवार यांच्यावर मिमिक्री करत टीका केली. जितेंद्र आव्हाडांनी त्यालाही प्रत्युउत्तर कालच देऊन टाकले आहे. यावेळी राज ठाकेरंनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार असे म्हणत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.