सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरीचा वादळ निर्माण करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आम्ही शिवसेनेचेच (Shivsena) आहोत, असा नारा लावल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेमकी कुणाची ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांची की, एकनाथ शिंदे गटाची ? असे प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडले आहेत. अशातच शिवसेनेचं अधिकृत चिन्ह शिंदे गटाला मिळणार का, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. परंतु शिवसेनेच्या चिन्हाबाबत खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी मोठं विधान केलं आहे. धनुष्यबाण हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा आहे. तो बंडखोरांचा नाही. धनुष्यबाण (Bow and Arrow) आणि शिवसेनेचं नातं कोणीही तोडू शकत नाही. धनुष्यबाण फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, असं म्हणत राऊत यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.
शिवसेनेची भूमिका मांडताना विनायक राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, धनुष्यबाण हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा तो बाडग्यांचा नाही. धनुष्यबाण आणि शिवसेनेचं नातं कोणीही तोडू शकत नाही. तो फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा. काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न केलेल्या विधानाबाबच मीडियात बातम्या झळकल्या. याद्वारे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.
आमदार वैभव नाईक यांना भाजपकडून पैशांची ऑफर करण्यात आली होती, असा आरोपही राऊत यांनी केला. यावर बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांकडून शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी यंत्रणेचा वापर करून पटवण्याचं काम करण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणजे आमदार वैभव नाईक यांना खूप मोठ्या खोक्यांची ऑफर देण्याचा प्रयत्न झाला. मात्र वैभव नाईक यांनी खोक्याची ऑफर धुडकावत शिवसेनेची निष्ठा काय असते, ती इतर गद्दारांना दाखवून दिली.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.