santosh bangar  saam tv
महाराष्ट्र

'अँग्री बांगर' पुन्हा चिडले; वीज तोडली तर रट्टे द्यायला लावीन, महावितरण अधिकाऱ्यांला संतोष बांगरांची धमकी

पुन्हा एकदा 'अँग्री बांगर' यांचा महावितरण अधिकाऱ्यांला झापतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

हिंगोली : शिंदे गटाचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्यातील सत्तांतर ते सत्ता स्थापनेनंतर संतोष बांगर विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. बांगर यांच्या रागामुळे सातत्याने चर्चेत असतात. (Latest Marathi News)

आता पुन्हा एकदा 'अँग्री बांगर' यांचा महावितरण अधिकाऱ्यांला झापतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) महावितरण अधिकाऱ्याला दम देताना दिसत आहेत. यापुढे लाईन तोडली तर रट्टे द्यायला लावीन, अशा शब्दात बांगर यांनी एका अधिकाऱ्याला दम दिली.

समोर आलेल्या व्हिडीओत आमदार संतोष बांगर त्यांच्या गाडीत बसून लाऊड स्पीकरवर कर्मचाऱ्याशी बोलताना दिसत आहेत. मतदारसंघातील काही गावांतील वीज तोडल्यामुळे यावेळा बांगर यांचा राग अनावर झाला. मग त्यांनी थेट महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन लावून झापलं.

"इकडंची लाईन कुणी तोडली. लाईन तोडायची नाही कळत नाहीत का. दुसरं कुणी असतं तर रट्टे द्यायला लावेल. तुम्हाला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही. असा इशारा बांगर यांनी दिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी देखील संतोष बांगर यांनी हिंगोलीतील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होते. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.त्याआधी कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर संतापले होते.त्यावेळी त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT