शिवसेना आमदार संजय गायकवाड
शिवसेना आमदार संजय गायकवाड  SaamTvNews
महाराष्ट्र

शिवसेना आमदार संतापला; भाजपसह नेत्यांवर गंभीर आरोप

संजय जाधव

बुलढाणा : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली तसेच चपलाही फेकल्या होत्या. या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर राज्यातील काही भाजप (BJP) नेत्यांनी हल्ल्याचे अप्रत्यक्ष समर्थन करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले होते.

हे देखील पहा :

भाजपाचे नेते शरद पवार साहेबांच्या कामाची उंची कधीच समजू शकणार नाहीत. अशी टीका बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजपसह नेत्यांवर केली आहे. संजय गायकवाड यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही जोरदार शाब्दिक हल्ला केला. गायकवाड म्हणाले, गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. गुणरत्न सदावर्ते हे कोणाच्या आदेशाने काम करतात हे सर्वांना ठाऊक आहे.

मराठा समाजाला ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळेच आरक्षण मिळाले नाही. सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे संबंध सर्वाना माहीत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या मागे कोण आहे हे आता लपून राहिलेले नाही. भाजप नेते अनिल अनिल बोंडे यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा करणे म्हणजेच राज्यात दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लावण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचा आरोपही आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जुमला पर्व संपतंय, येत्या ४ जूनपासून अच्छे दिन येतील; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भाजपवर टीका

Health Tips: या लोकांनी फणस खाऊ नये

Today's Marathi News Live: अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

SCROLL FOR NEXT