कुचिक प्रकरणातील पीडितेच्या आरोपानंतर चित्रा वाघांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या...

पीडित मुलगी हे सर्व कुठल्या मजबुरीत बोलतेय हे मला माहीत नाही. मात्र, त्या मुलीसोबत अन्याय झाला तेव्हा तिच्या मदतीला कुणीही आलेलं नाही.
Chitra Wagh
Chitra WaghSaam Tv

- सुशांत सावंत

मुंबई : पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच दबाव आणल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तरुणीने केलेल्या आरोपानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत.

चित्रा वाघ म्हणाल्या, राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना अनेक अनुभव येत असतात. रघुनाथ कुचिक याने एका मुलीवर बलात्कार (Rape) केला आणि तिचा गर्भपात केला. मी सदर पीडित मुलीला म्हणाले गरज लागली तर मला नक्की फोन कर. एक मुलगी जी एकटी लढते आणि तिच्या एकटेपणाचा गैरफायदा काही लोकांकडून केला जातो. मी तिच्यासोबत लढायचं ठरवलं मला सर्व माहिती त्या मुलीकडून मिळाली. तेव्हा मी ठरवलं की ही एकटी मुलगी लढत आहे तिच्यासोबत आपणही लढायला हवं.

पीडित (Victim) मुलगी एकटी लढत होती, तेव्हा कोणता पक्ष तिच्या मदतीला आला नाही. पीडित मुलगी तिची सर्व आपबिती घेऊन माझ्याकडे आली तेव्हा मी तिला सर्वतोपरी मदत केली. आणि आज माझ्यावरच आरोप केले जात आहेत. पीडितेच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर मुलीला ब्लॅकमेल केल्याचे आरोप केले. विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्या आरोपांना उत्तर देतांना चित्रा वाघ म्हणाल्या, विद्या चव्हाण यांनी तोंड सांभाळून बोलायला हवं.

पीडित मुलगी हे सर्व कुठल्या मजबुरीत बोलतेय हे मला माहीत नाही. मात्र, त्या मुलीसोबत अन्याय झाला तेव्हा तिच्या मदतीला कुणीही आलेलं नाही. जेव्हा चित्रा वाघ तिच्या मदतीला धावली तेव्हा सर्वजण जागे झाले. मात्र, जर कोणाला वाटत असेल कि हे सर्व करून वाटत असेल की हे सर्व करून तुम्ही माझा आवाज बंद करत असाल तर तो होणार नाही. आजपर्यंत काही लोकांनी माझ्या घरावर देखील हल्ले केले आहेत, मात्र मी अन्यायाविरुद्ध लढणे थांबवले नाही.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, पीडित मुलगी जे काही बोलली आहे ते सर्व पोलिसांनी (Police) तपासले पाहिजे. माझ्या जागेवर कुणी दुसरे असते तर त्यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असता का? पीडित मुलीने मला एक पत्राचा स्क्रिन शॉट पाठवला आहे. आणि तिच्या सोबत घडलेल्या सर्व प्रकाराची हकीकत सांगितली. मात्र, आज या मुलीने उलट माझ्यावरच आरोप केल्यानंतर राज्यातील यंत्रणा सज्ज झाल्यात. ती मुलगी आजपर्यंत माझ्या संपर्कात होती. त्यामुळे मी तिची मनःस्थिती समजू शकते. तिच्यासाठी मला जे जे काही करता आले ते मी करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे यंत्रणांनी जे असेल ते सत्य पूढे आणावे, मी सर्व पुरावे द्यायला तयार आहे. पीडित मुलगी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर स्वतःला संपवायला आली होती. मुंबई पोलीस, कायदा व सुव्यवस्था सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मी त्यावेळी हा सर्व प्रकार सांगितला होता. मात्र, काही हरकत नाही असे प्रकार होत राहतात. पण, मी कुणाला न्याय द्यायचे सोडणार नाही. चित्रा वाघ सदैव पीडित मुलीसोबत असेल. मात्र, जो अत्याचार करतो तो गुन्हेगार आहेच पण जो सहन करतो तोही तितकाच गुन्हेगार आहे, असेही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com