nitin deshmukh  Saam Tv
महाराष्ट्र

सुरतेहून सुटका! एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदार नितीन देशमुख यांचा गुजरातमधला थरारक अनुभव

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारलेले आमदार महाविकास आघाडी सरकारला एकाहून एक हादरे देत आहेत.

नरेश शेंडे

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असतानाच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंड पुकारलेले आमदार महाविकास आघाडी सरकारला (mva government) एकाहून एक हादरे देत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी गुजरातमधला थरारक अनुभव सांगितला आहे. सूरतमध्ये माझा घात करण्याचा डाव होता. जबरदस्तीने माझ्या दंडात इंक्जेक्शन टोचण्यात आलं होतं. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यासोबत आहे, असं देशमुख यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरु असताना अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती होती. नितीन देशमुख यांचा रक्तदाब वाढल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, नितीन देशमुख आज नागपूर विमानतळावर परतले आहेत.

नागपूरमध्ये परतल्यानंतर त्यांनी मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे. तर, सूरतमध्ये माझा घात करण्याचा डाव होता, मला कसली तरी इंजेक्शन टोचण्यात आली, असं नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं.नितीन देशमुख यांना पत्रकारांनी तुम्ही आलात बाकीच्यांचं काय असं विचारलं असता, त्यांनी धीरे धीरे सर्व ठीक होईल, असं म्हटलं होतं.

नितीन देशमुख यांनी काय आरोप केला होता?

माझा रक्तदाब वाढला नव्हता.पण मला हार्ट अॅटक आल्याचा बनाव रचण्यात आला.मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले.ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते.मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.आता मी माझ्या घरी जात आहे.

मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो.रस्त्यावर तीन वाजता उभा होता.पण माझ्यापाठी २०० पोलीस होते.कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते.त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्टअॅटक असल्याचा बनाव रचला,असे नितीन देशमुख यांनी सांगितले. उस्मानाबादमधील कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे दोन माघारी आले आहेत.

नितीन देशमुख अकोल्यात परतले...

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा पुकारल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल होते. नितीन देशमुख हे अकोल्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत. ते देखील २० जून'च्या रात्रीपासून नॉट रिचेबल होते, देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. ते आज अकोल्यात परतले. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT