MLA Disqualification Case Saam TV
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification Case: तब्बल ३१८ प्रश्न, जशासं तसं उत्तर... अखेर सुनील प्रभूंची उलट तपासणी संपली; आज काय घडलं?

Shivsena Crisis News: शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी अखेर आज संपली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या दोन आठवड्यापासून ही सुनावणी सुरू होती.

Gangappa Pujari

Shivsena MLA DisqualiFication Case:

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी अखेर आज संपली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या दोन आठवड्यापासून ही सुनावणी सुरू होती. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सुनील प्रभू यांची उलटतपासणी पुर्ण झाल्यानंतर शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयाचे सचिव यांचीही उलट सुनावणी झाली.

सुनावणीत काय- काय घडलं?

गेल्या दोन आठवड्यांपासून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होती. अखेर आज (शनिवार, २ डिसेंबर) ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची उलट साक्ष पुर्ण झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभूंना तब्बल ३१८ प्रश्न विचारण्यात आले. एकनाथ शिंदेंचे बंडावेळीचा संपूर्ण घटनाक्रमावरुन प्रश्न विचारुन सुनील प्रभूंची कोंडी करण्याचा प्रयत्न महेश जेठमलानींकडून झाला.

यामध्ये एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या मेलवरुन दोन्ही वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचेही पाहायला मिळले. एकनाथ शिंदेंना बनावट आयडीवर मेल पाठवल्याचा आरोप शिंदे गटाने केला तर शिंदेंचा आयडी खरा होता, त्यावरच मेल पाठवल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीनंतर शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयाचे सचिव विजय जोशी यांचीही उलट सुनावणी झाली. वकील महेश जेठमलानी यांच्याकडून व्हीप ड्राफ्ट, व्हीप कोणी दिला यावर विजय जोशींना प्रश्न विचारण्यात आले.

विजय जोशींच्या उलट तपासणीसोबतच ठाकरे गटाच्या नेत्यांची साक्ष पुर्ण झाली. या पुढे ठाकरे गटाच्या वकिलांकडून शिंदे गटाच्या नेत्यांची साक्ष नोंदवण्याचे काम सुरू होईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ आणि ८ डिसेंबरला नागपूरमध्ये होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

ST Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, आता बंजारा समाजाला हवे, STमधून आरक्षण

SCROLL FOR NEXT