Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar Reaction on Shiv Sena MLA Disqualification Case ssd9 Saam TV
महाराष्ट्र

Shivsena News: महेश जेठमलानींचे कोंडी करणारे सवाल, सुनील प्रभू अडखळले; शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात

Shivsena Crisisi News: अनिल देसाई यांनी ४-४-२०१८ ला निवडणुक आयोगाला दिलेले हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. हे पत्र पक्षांतर्गत घटनेत सुधारणा करून पक्ष प्रमुख पद तयार करून त्यांना सर्व अधिकार दिल्याचे आणि इतर संघटनात्मक बदल केल्याचे आहे.

Gangappa Pujari

Shivsena MLA Disqualification :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या सुनावणीमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळत असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांच्याकडून उलटतपासणी सुरू आहे. यामध्ये सुनील प्रभूंना अनेक प्रश्न विचारत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न महेश जेठमलानींनीकडून करण्यात आला. आधीच्या सुनावणीत झालेल्या ई- मेलवरुनही महेश जेठमलानी यांनी उलट तपासणी केली.

सुनावणीत काय घडलं?

"शिवसेनेमध्ये ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येतं का?" असा प्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारला. यावर सुनील प्रभूंनी "सेनेच्या घटनेमध्ये जे आहे त्यानुसार नियुक्ती केली जाते," असे उत्तर दिले. तसेच शिवसेनेची घटना त्यांच्या विचारधारेशी विरूद्ध अशा पक्षाशी युती करण्याची मुभा देते का? असा प्रश्नही जेठमलानी यांनी विचारला.

त्यावर सुनील प्रभू यांनी हो असे उत्तर दिले. यावेळी 2018 नंतर शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच नाहीत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची नियुक्ती वैध नसल्याचं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी म्हणाले.

दरम्यान, आजच्या सुनावणीत अनिल देसाई यांनी ४-४-२०१८ ला निवडणुक आयोगाला दिलेले हे पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. हे पत्र पक्षांतर्गत घटनेत सुधारणा करून पक्ष प्रमुख पद तयार करून त्यांना सर्व अधिकार दिल्याचे आणि इतर संघटनात्मक बदल केल्याचे आहे. हे पत्र निवडणुक आयोगाला दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. पण हे पत्र बनावट असून आजपर्यंतच्या कोणत्याच सुनावणीत सादर करण्यात आलेले नाही असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT