Eknath Shinde Latest News Saam TV
महाराष्ट्र

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर म्हणाले, एकही आमदार मंत्री होणार नाही, तरीही..."

शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने राज्याचा कारभार हाती घेतल्याने राजकीय वर्तुळातून टीका-टीप्पणीला सुरुवात झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरु होतं. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राजभवनात घेतली. त्यानंतर सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने राज्याचा कारभार हाती घेतल्याने राजकीय वर्तुळातून टीका-टीप्पणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार दीपक केसकर (deepak kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेवून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर म्हणाले, एकही आमदार मंत्री होणार नाही, तरीही आम्ही शिंदे साहेबांसोबतच आहोत. आमच्या पैकी एकाही आमदाराने मंत्रीपद मागितले नाही. मंत्रीपदाबाबतची कोणतीही यादी तयार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले, संजय राऊत यांना काय माहीत आहे , शरद पवार आणि माझे संबंध काय आहेत ते? शरद पवार यांनी मला खूप शिकवलं आहे. आयुष्यात आतापर्यंत मी शरद पवार यांच्यावर टीका केली नाही. दोनच व्यक्तींना मी आदर्श मानलं, एक म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार. मी कधी माध्यमांसमोर येत नाही, पण या 50 आमदारांच्या मतदार संघातील नागरिकांना समजावणे, हे खूप गरजेचं आहे. संजय राऊत हे कधी नागरिकांमधून निवडून आले नाहीत.

संजय राऊत तुम्ही आमच्या मतांवर खासदार झाला आहात. संजय राऊत तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा कोणत्या आमदारांच्या मतावर निवडून येता तसे या. नारायण राणेंची यांची मुलं लहान आहेत,त्यांना ट्विट करण्याची आवड आहे. हे खरंच ईडीचं सरकार आहे. पण ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहेत. संजय राऊत ज्या चौकशीला गेलेत ती ईडी वेगळी आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi News : महायुतीने महाराष्ट्राला कमजोर केलं; प्रियांका गांधी यांची राज्य सरकारवर फटकेबाजी | VIDEO

IND vs AUS: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Rohit पर्थ कसोटी खेळणार?

Mumbai Local News: पश्चिम रेल्वे मार्गावर १२ तासांचा ब्लॉक, एका क्लिकवर वाचा वेळापत्रक

Bollywood Actor: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सर्वांत श्रीमंत कोण?

Palak Tiwari - Ibrahim ali khan Photos: पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या डेटिंगच्या चर्चा; मालदीवचे फोटो झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT