मुंबई : राज्याच्या राजकारणात शिवसेनेला (shivsena) जोरदार धक्का देऊन बंडाचं निशाण फडकावणाऱ्या आमदारांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, आमदार आणि आता खासदारही सामील होत असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आले असून बंडखोर आमदारांवर घणाघात करत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. शिवसेनेत गद्दारी करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं, असा सणसणीत इशारा ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघात विविध विकास कामांच्या शुभारंभ केला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडलं.शिंदे गटाने नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बोलताना, गद्दारांची पॉलिटिकल सर्कस सुरू आहे, अशी तोफ ठाकरे यांनी विरोधकांवर डागली.
यावेळी ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं,पण त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. हे मंत्रिमंडळ नाही आहे. आज पूर परिस्थिती असताना, शेतकरी हवालदिल झाला असताना मंत्रिमंडळ नाही आहे, हे खूप गंभीर आहे. तसंच आताचं जे आहे ते देखील मंत्रिमंडळ घटनेवर आधारित नाही,असं आदित्य ठाकरे म्हणाले.
वरळी माझा मतदार संघ आहे. यापूर्वीही आम्ही कामांचा शुभारंभ करत होतो. याआधीही चाळींच काम सुरु केलं. जसा निधी येतो तशी कामं केली जातात. प्रत्येक कॅबिनेटच्या आधी आम्ही बसायचो,प्रत्येकाची कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
वरळीतील शाखा क्रमांक १९८ आणि १९९ भागातील विविध विकासकामांचे उद्घाटन
- मच्छी मार्केट सातरस्ता लोकार्पण.
- इस्लामी इमारतीची दुरुस्ती करणे.
- हाजी कासम इमारतीची दुरुस्ती करणे.
- १०० मेहेर लॉज वाडी इमारतीची दुरुस्ती करणे.
- ८६ जमशेद इमारतीची दुरुस्ती करणे.
- ४०४ बी बी महावीर प्रसाद चाळ इमारतीची दुरुस्ती करणे.
- ४०४ ए कृष्णा इमारतीची दुरुस्ती करणे.
- पृथ्वी वंदन सोसायटीचे पॅसेज व प्रवेशद्वार दुरुस्ती करणे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.