Aditya Thackerays Emotional Post for Sanjay Raut Saam
महाराष्ट्र

संजय काका, काळजी घे! आदित्य ठाकरेंची संजय राऊतांसाठी खास भावूक पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

Sanjay Raut Announces Break from Public Life: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड. २ महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यापासून दूर.

Bhagyashree Kamble

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झालीये. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी २ महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात कार्यकर्त्यांसाठी पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली. राऊतांच्या तब्येतीबाबत माहिती समोर येताच राजकीय वर्तुळासह चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत प्रत्येकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ठणठणीत बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली. या भावनिक पोस्टची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट समाजमाध्यमांमध्ये शेअर केली आहे. 'संजय काका, काळजी घे! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून काका तू लढतोस. तसेच जिंकतोस. आता देखील तेच होणार, याची मला खात्री आहे', असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आदित्य ठाकरे यांची संजय राऊतांसाठी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीनींही पोस्ट लिहून बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. 'लवकर बरे व्हा' अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच महायुतीतील अनेक नेत्यांनीही संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.

संजय राऊतांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

'जय महाराष्ट्र! आपण नेहमीच माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवलंय. दरम्यान, माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूराचे बिघाड झाले आहे. सध्या उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार, मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागेल. मला खात्री आहे मी लवकरच ठणठणीत बरा होईन. नवीन वर्षांत तुमच्या भेटीस येईन', असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

SCROLL FOR NEXT