Shivsena MLA Aditya Thackeray Slams Shirsat Saam Tv News
महाराष्ट्र

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

Minister Sanjay Shirsat Viral Video: मंत्री संजय शिरसाट यांचा सिगारेट ओढतानाचा आणि बेडखाली पैशांची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल. विरोधकांचा हल्लाबोल, आदित्य ठाकरेंनी भ्रष्टाचारावरून केली जोरदार टीका.

Bhagyashree Kamble

राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसलेले दिसत आहे. त्यांच्या हातात सिगारेट आणि फोनवर संभाषण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या बेडखाली एक बॅग ठेवलेली असून, ती पैशांनी भरलेली असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी शिरसाट यांच्यावर टीकेची तोफ डागली. या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

शिरसाट यांच्यावर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, 'गेल्या अडीच वर्षात ३३ देशांमध्ये गद्दारांची नोंद घेण्यात आली. पन्नास खोके एकदम ओके, त्यातील १ खोका आज दिसला असेल. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे', असं आदित्य ठाकरे म्हणाले. 'परवा एक आमदार हाणामारी करताना दिसला. आज एक खोक्यासोबत बसले आहेत. आता ते सांगतील, तिथे महात्मा गांधी छापलेले बनियन होते. बाकी काही त्यात नव्हतं. पण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे', असं ठाकरे म्हणाले.

'ते मंत्री आहेत. त्यांच्यावर आधीपासूनच हॉटेल बळकावणे, जमीन हडपणे यांसारखे गंभीर आरोप आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते. पण आता प्रश्न असा आहे की, या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंधे त्यांच्यावर कारवाई करणार का? ते बिलकुल कारवाई करणार नाही', असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आयटीच्या नोटीशीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, 'कालच त्यांना आयटीची नोटीस आली असूनही ते ऐटीत फिरत आहेत. भाजप खरोखरंच भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणार का, हे पाहावं लागेल', असा हल्लाबोल यावेळी त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT