Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटापुढे मोठा पेच, सत्ता स्थापनेसाठी कोणता निर्णय घेणार ?

एकनाथ शिंदे गटात आणि शिवसेनेत संघर्ष सुरु असून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकवून शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे जवळपास ४० आमदार शिंदे समर्थक झाल्याने शिवसेना हवालदील झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे समर्थकांकडून राजकीय डावपेच आखले जात आहे. शिंदे गटात आणि शिवसेनेत (Shivsena) संघर्ष सुरु असून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलं आहे. अशातच राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गट नवनवीन रणनीती आखत आहे. परंतु, संविधानाच्या शेड्युल १० नुसार बंडखोर आमदारांचा गट हा वेगळा गट स्थापन होऊ शकत नाहीय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संविधानाच्या शेड्युल १० नुसार बंडखोर आमदारांचा गट हा वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासोबत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या आमदारांना कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावे लागेल. एकनाथ शिंदे गटापुढे भाजप किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा पर्याय आहे.

त्यामुळेच प्रहारच्या आमदारांना एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत घेवून गेले, अशीही चर्चा आहे. दरम्यान, प्रहारमध्ये जाण्यास आमदार तयार होतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नाहीतर या आमदारांना भाजप पक्षात जाण्याचा शेवटचा पर्याय असेल. त्यामुळे आमदार ह्या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारतील ? हाच पेच कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एकनाथ शिंदेंसह १७ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यानंतर शिंदे यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. असं ट्विट शिंदे यांनी केलं होतं. दोन-तृतीयांश आमदार आमच्यासोबत असल्याने व्हिप जारी करता येत नाही, असंही शिंदे म्हणाले होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT