Sharad Pawar and Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण....; शिवसेना खासदार स्पष्टच बोलले

शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी खळबळजनक टीप्पणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde) बंडाचा झेंडा फडकवल्याने महाविकास आघाडी सरकार (mva government) कोसळलं. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाल्याने शिवसेनेला जोरदार धक्का बसला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेचे नगरसेवक, आजी-माजी आमदार आणि १२ खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी खळबळजनक टीप्पणी केली आहे. उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं. खंजीर खुपसायचा काही प्रश्नंच नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडा हीच मागणी होती, अशी प्रतिक्रिया तुमाने यांनी दिली आहे.

खासदार तुमाने माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही शिवसेनेतंच आहोत, फक्त आम्ही गटनेता बदलला आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आम्ही गेल्या वेळेस भाजपसोबत निवडणूक लढलीय. आमच्यात नाराजी होती. कारण आम्ही हिंदूत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपसोबत होतो. आतंकवाद्यांना मदत करणारे मंत्रीमंडळात होते. आमचे विचार काँग्रेस,राष्ट्रवादीशी पटणारे नव्हते. मी उद्धव ठाकरे यांना पाचवेळा भेटलो,मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवायला हवी होती, असंही तुमाने म्हणाले.

विनायक राऊत यांचा भयानक त्रास होता. विनायक राऊत आम्हाला सभागृहात बोलू देत नव्हते. गेल्या एक वर्षांपासून विनायक राऊत यांनी बुधवारची बैठक घेतली नाही. विनायक राऊत यांना हटवण्याचं काम गेल्या अधिवेशनातंच होणार होतं. उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. शरद पवार यांनी त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलंय. खंजीर खुपसायचा काही प्रश्नच नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडा हीच मागणी होती, असंही तुमाने यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT