shivsena maha adhiveshan in kolhapur raju shetti warns cm eknath shinde know the reason Saam tv
महाराष्ट्र

शिवसेनेचे उद्यापासून कोल्हापुरात महाअधिवेशन, 'स्वाभिमानी' आंदाेलनाच्या तयारीत; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

ऊस उत्पादक शेतक-यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे 100 रूपये थकीत बील तातडीने देणे संदर्भात शासनाने पावले उचलावीत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

उद्यापासून कोल्हापुरात शिवसेनेचे महाअधिवेशन (shivsena maha adhiveshan in kolhapur) हाेणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासह नऊ मंत्री , 43 आमदार, 13 खासदार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत शब्द पाळावा अन्यथा काळे झेंडे दाखवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला. (Maharashtra News)

गेल्या हंगामातील गाळप झालेल्या उसाला शंभर रुपये अधिक दर द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. राजू शेट्टी यांनी आंदोलन छेडल्यानंतर तसेच पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये मध्यस्थी करत तोडगा काढला होता.

दरम्यान आजही अतिरिक्त पैसे देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 16 साखर कारखानदार नकार देत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादक शेतक-यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे 100 रूपये थकीत बील तातडीने देणे संदर्भात शासनाने पावले उचलावीत अन्यथा मुख्यमंत्र्याना कोल्हापुरात 16 फेब्रुवारीला काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT